PM Modi-Giorgia Meloni Saam TV
देश विदेश

PM Modi-Giorgia Meloni Selfie : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी PM मोदींच्या फॅन, 'गुड फ्रेंड्स' म्हणत शेअर केला सेल्फी

प्रविण वाकचौरे

PM Narendra Modi-Giorgia Meloni News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात आहे. जागतिक स्तरावरील मोठे नेते मोदी यांच्यासोबत फोटो काढताना दिसतात. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरलेला नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक सेल्फी शेअर केला आहे . जॉर्जिया यांनी आपल्या X हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मेलोनी यांनी #Melodi हा हॅशटॅग वापरला आहे. मेलोनी यांनी फोटोला कॅप्शन देताना म्हटलंय की, "गूड फ्रेंन्ड्स अॅट COP28." दोन्ही नेते फोटोत हसताना दिसत आहेत.

वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिटच्या निमित्ताने इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दुबईत आयोजित COP28 शिखर परिषद 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुबईत पोहोचले होते आणि शुक्रवारी रात्री उशिरा भारताकडे रवाना झाले. (Latest Marathi News)

इतर बड्या नेत्यांच्या भेटीगाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ब्राझीलचे पंतप्रधान लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरून, माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचीही भेट घेतली. पीएम मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या चार सत्रांना संबोधित केले. परिषदेत पीएम मोदी आणि इतर नेत्यांनी एकत्र ग्रुप फोटोही काढला.

COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये ज्या देशांनी 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान करारावर स्वाक्षरी केली होती त्यांचा समावेश आहे. सीओपीची ही २८ वी बैठक आहे. त्यामुळे याला COP28 म्हटले जात आहे. COP28 पृथ्वीच्या तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट राखेल अशी अपेक्षा आहे. 2015 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या करारात सुमारे 200 देशांमध्ये यावर सहमती झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT