Wreckage of the aircraft involved in the tragic Ahmedabad plane crash as new international claims raise fresh questions. Saam Tv
देश विदेश

पायलटनं विमान ठरवून पाडलं? खळबळजनक दावा

Ahmedabad Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धुक पसरलेलं असताना आता अहमदाबाद विमान अपघातावरून इटालियन वृत्तपत्रानं खळबळजनक दावा केलाय.... पायलटनं विमान ठरवून पाडलं का? असा सवाल उपस्थित होतोय...इटलीच्या वृत्तपत्रानं नेमका काय दावा केलाय?

Suprim Maskar

12 जून 2025 ला संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा विमान अपघात घडला.... अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान अवघ्या काही मिनटातचं कोसळले... आणि तब्बल 260 जणांचा अपघातात मृत्यू झाला...अजुनही या विमान अपघाताच गूढ अद्याप कायम आहे... त्यात AAIB सारख्या यंत्रणांकडून या विमान अपघाताचा तपास सुरु असताना इटलीतील एका वृत्तपत्रानं मोठा दावा केलाय...इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार अहमदाबाद दुर्घटनेला नेमकं कोण जबाबदार होतं?

इटलीच्या वृत्तपत्राचा दावा काय?

'विमान अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नाही'

'पायलटने जाणीवपूर्वक इंधनचा पुरवठा बंद केला'

'पायलटनं केलेल्या जाणीवपूर्वक कृत्यामुळे अपघात'

'भारतीय तपास यंत्रणांकडून अंतिम अहवालाची तयारी'

भारतातील तपास यंत्रणा मोठा खुलासा करणार असल्याचा दावा

कॅप्टन सुमित सभरवाल नैराश्यग्रस्त असल्याचाही उल्लेख

दरम्यान याआधी जुलै 2025 मध्ये भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोनं प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता... या अहवालातही इटलियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार धक्कादायक माहिती समोर आली होती..

अहवालात एका पायलटने इंधन पुरवठा बंद केल्याचा कथित उल्लेख

कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एक पायलट "तु इंधन का बंद केला?" असं विचारतो

दुसरा पायलट "मी तसं काहीही केलं नाही", असं उत्तर देतो

एएआयबीच्या प्राथमिक निष्कर्षांनंतर वैमानिक संघटनांनीही याचा निषेध केला होता, तर सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी आरोप फेटाळून लावत नव्याने चौकशीची मागणी केली होती. तसचं आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या अफवांही फेटाळून लावल्या होत्या...त्यात आता परदेशस्थ विमान वाहतूक संस्थेकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात दावा केला जात असताना तपास यंत्रणांनी अपघाताचं सत्य लवकरात लवकर उघड करणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवडी

Kidney Health: किडन्या खराब होऊ नयेत म्हणून आत्ताच जीवनशैलीत करा हे 7 बदल

Khana Saree Design: लग्नात नेसण्यासाठी पाहा या 7 ट्रेंडी आणि बजेटमध्ये असलेले सुंदर खणाच्या साड्या

Night Sweating Causes: रात्री झोपल्यानंतर शरीरातून घाम का येतो?

Couple Ring Designs : 'कपल रिंग'च्या आकर्षक डिझाइन्स, तुमचा रोमँटिक अंदाज पाहून बायको होईल खुश

SCROLL FOR NEXT