ISRO Aditya L1 Mission Saam TV
देश विदेश

ISRO Aditya L1 Mission : इस्रो नवा इतिहास रचणार; 'आदित्य एल-1' आज महत्त्वाच्या पॉईंटवर पोहोचणार

ISRO Solar Mission : L-1 पॉईंटच्या सभोवतालचा प्रदेश हालो ऑर्बिट म्हणून ओळखला जातो. जो सूर्य-पृथ्वीच्या सिस्टिममधील पाच ठिकाणांपैकी एक आहे. हे असं ठिकाणी आहे, जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना संतुलित करतात.

प्रविण वाकचौरे

Aditya L1 Mission :

चांद्रयान - 2 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारत आणखी एक इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. सूर्य मोहिमेवर ISROचे आदित्य एल-1 शनिवारी दुपारी 4 वाजता आपल्या निश्चितस्थानी म्हणजेच लॅग्रेंज पॉइंट-1 (L1) वर पोहोचेल आणि अंतिम कक्षेत स्थिरावेल. येथे आदित्य 2 वर्षे सूर्याचा अभ्यास करेल आणि महत्त्वाची माहिती गोळा करेल. भारतातील ही पहिली सूर्य अभ्यास मोहीम इस्त्रोने 2 सप्टेंबर रोजी सुरू केली.

L-1 पॉईंटचं महत्त्व

L-1 पॉईंटच्या सभोवतालचा प्रदेश हालो ऑर्बिट म्हणून ओळखला जातो. जो सूर्य-पृथ्वीच्या सिस्टिममधील पाच ठिकाणांपैकी एक आहे. हे असं ठिकाणी आहे, जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना संतुलित करतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये या पाच ठिकाणी स्थिरता आहे. त्यामुळे येथे असलेली वस्तू सूर्य किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकत नाही.

L-1 पॉईंटपासून पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या फक्त 1 टक्के आहे. दोन्ही ग्रहांमधील एकूण अंतर 14.96 कोटी किलोमीटर आहे. अंतिम कक्षेत पोहोचणे खूप आव्हानात्मक आहे आणि इस्रो पहिल्यांदाच असा प्रयत्न करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नासाचे तीन उपग्रह आधीपासूनच उपस्थित

ISRO च्या मोहिमेकडे जगाचं लक्ष लागलं आहे. अंतराळ यानामध्ये कोरोनग्राफ आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून निरीक्षण करता येईल. एल-1 या लॅग्रेंज बिंदूवर WIND, ACE आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत. यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे लाँच केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी (SOHO) हा उपग्रह देखील याठिकाणी आहे.

आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Kartoli Bhaji Recipe: श्रावणात करटोलीची भाजी कशी बनवायची?

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी रेडी, शिंदे-फडणवीस नेमकं काय करणार?

SCROLL FOR NEXT