Tuesday Horoscope: ५ राशींच्या हातात पैसा, काहींना प्रवासातून लाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आजचा दिवस शुभ दिवस आहे. नागदिवे पूजनाचा दिन. आपल्या राशीला अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. करिअरच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत.

मेष राशी | saam tv

वृषभ

काहीतरी चांगली बातमी ज्याची अनेक दिवसात आपण प्रतीक्षेत होता अशी आज आपल्या कानावर येईल. मात्र दानधर्म, दानत चांगली ठेवलीत तर भाग्य फुलून येईल.

वृषभ | Saam Tv

मिथुन

जोपर्यंत आपल्याला मान आहे एखादे पद आहे तोपर्यंत आपल्या जवळपास लोक येतात. काही वेळेला पाठ फिरवल्यासारखे लोकांचे वागणं असते. आज याची अनुभूती तुम्हाला येईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कष्टाला पर्याय नाही असे काही दिवस असतात. आज धावपळ दमणूक होईल.पण कामाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडतील.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

पाठीची दुखणे असतील. तर आज त्याचा त्रास अधिक संभवतो आहे. हृदयाची काळजी घ्या. मामा, मावशीच्या प्रेमामुळे एक भावनिक ओलावा जाणवेल.

सिंह राशी | saam tv

कन्या

आज नागदिवे पूजनाचा दिवस आहे. शुभ गोष्टी करायला उत्तम फलिते आपल्या राशीला मिळणार आहेत. शेअर्स निगडित व्यवहार करायला आज हरकत नाही.

कन्या | Saam Tv

तूळ

प्रपंच करताना काय गोष्टी लागत नाहीत. सगळ्याचा हव्यास आवडणे आपल्या राशीला आहेच. आज घरासाठी नवीन खरेदी कराल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

भावंडांचा विशेष आधारा आज आपल्याला वाटेल. रेंगाळलेले पत्रव्यवहार होतील. जवळचे प्रवास घडतील काहीतरी नवी ऊर्जा आणि जिद्द घेऊन आज कामे कराल.दिवस चांगला आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

काही गोष्टींचे निर्णय घेताना आपली रास द्विधा मनस्थिती असते. आज या गोष्टी टाळा. सहज सोप्या गोष्टी अवघड करण्यापेक्षा योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे जा. दिवस चांगला आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

तशी अबोल आणि साधी असणारी आपली रास आहे. पैशाची निगडित हात आखडता घेता पण आज मनसोक्त जगावे असे वाटेल. आपली सकारात्मकता वाढेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आपल्या राशीला संशोधनात्मक कार्यामध्ये विशेष रस आहे. याचा पाठपुरावा कराल. भले वाटेत अडचणी आल्या तरी त्या काट्यासारख्या दूरही कराल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

मित्र-मैत्रिणींचे आयुष्यामध्ये एक वेगळी आणि हक्काची जागा आपल्या राशीने इतरांना दिली आहे.आज यांच्याकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: या ४ चूकांमुळे घरात येते गरिबी, हातात पैसा टिकत नाही; चाणक्यांनी सांगितले सत्य

Chanakya Niti | google
येथे क्लिक करा