Chandrayaan-3  Saam Tv
देश विदेश

Chandrayaan-3 Update: 'ऑल इज वेल'... कंट्रोल रूममध्ये सध्या काय चाललंय?; 'चांद्रयान ३' मोहिमेबाबत इस्रो प्रमुखांनी दिली मोठी अपडेट

Chandrayaan-3 Latest News : इस्रो प्रमुखांनी 'चांद्रयान ३'बाबत महत्वाची माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ISRO Chief S. Somanath On Chandrayaan-3

अवघ्या देशाचे लक्ष 'चांद्रयान ३' (Chandrayaan 3) मोहिमेकडे आहे. २३ ऑगस्टला 'चांद्रयान ३' चंद्रावर सॉफ्ट लॅंडिग (अलगद अवतरण) करणार आहे. याबाबत इस्रो प्रमुखांनी महत्वाची माहिती दिली आहे. आम्हाला खात्री आहे. सर्व काही व्यवस्थित होईल, असं ते म्हणाले.

चांद्रयान २ च्या लँडरचं सॉफ्ट लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर सर्वत्र निराशेचे ढग दाटून आले होते. पण अवघ्या ४ वर्षांच्या आत पुन्हा चांद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. उद्या, बुधवारी २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ च्या लँडर मॉड्यूलचे चंद्रावर लँडिंग होणार आहे.

अवघ्या देशात उत्साहाचं आणि तितकीच धाकधूक देखील आहे. इस्रोच्या टीमचीही तीच अवस्था आहे. कंट्रोल रूममध्ये मोहिमेशी संबंधित इंजिनीअर आणि शास्त्रज्ज्ञ अगदी बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.

अशातच इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाची खात्री वाटतेय. प्रक्षेपणाच्या सर्व तयारीमुळे आणि इंटिग्रेटेड मॉड्यूल आणि लॅंडिग मॉड्यूलमुळे चंद्राच्या प्रवासात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही असा विश्वास आहे, असं इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी सांगितले.

'आम्हाला सर्व खात्री आहे. आतापर्यंत सर्व काही ठिक आहे. या टप्प्यापर्यंत कोणत्याही अडथळ्यांचा सामना केला नाही. आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. या टप्प्यापर्यंत सर्व यंत्रणांनी आवश्यक कामगिरी केली आहे. आता आम्ही मल्टिपल सिम्युलेशनसह लॅंडिगची तयारी करत आहेत. ज्यात सिस्टम व्हेरिफिकेशन (Verification),डबल व्हेरिफिकेशन तसेच लँडरशी संबंधित सर्व उपकरणे सुस्थितीत आहेत की नाहीत, याची तपासणी आज आणि उद्या (बुधवारी) केली जाणार आहे', असं सोमनाथ यांनी सांगितले.

रशियाचे 'लुना-२५' अपयशी ठरले. तर त्यानंतर आता इस्रोच्या चांद्रयान ३ चे लँडिंग जवळ आले आहे. मागील वेळी इस्रोचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. अवघ्या देशाचे चांद्रयान मोहिमेकडे लक्ष लागले आहे. याआधीही २०१९ ते २०२३ दरम्यान चंद्रावर लॅंडिगच्या चारपैकी ३ मोहिमा अयशस्वी ठरल्या आहेत. यात इस्त्राइलचे 'बेरेशीट', जपानचे 'हाकुटो-आर' आणि भारताच्या 'चांद्रयान २' (Chandrayaan 2)चा समावेश आहे. त्यात आता रशियाच्या 'लुना २५' चा समावेश झाला आहे.

विक्रमचा संपर्क चांद्रयान २ च्या ऑर्बिटरशी

लॅंडिग मॉड्यूल आणि ऑर्बिटरशी संपर्क होणे खूप महत्त्वाचे होते. जे २०२९ पासून चंद्राभोवती फिरत आहे. ते आता झाले आहे. चांद्रयान २ ऑर्बिटरशी लॅंडरच्या संपर्कासाठीची चाचणी पूर्ण झाली आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले.

इस्त्रोने स्पष्ट केले आहे की, लॅंडर आणि चांद्रयान २ मध्ये दोन्ही बाजूंनी संवाद सुरू झाला आहे. ज्यामुळे बेंगळुरूमधील इस्त्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कंमाड नेटवर्क येथे मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्सला लॅंडिंग मॉड्यूलपर्यंत पोहचण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT