Air India Saam Tv
देश विदेश

Israel-Palestine War: एअर इंडियाची इस्राइलला जाणारी उड्डाण १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द

Air India: एअर इंडियाकडून तेल अवीव येथून १४ ऑक्टोबरपर्यंत आपले उड्डाण रद्द करण्यात आलीय.

Bharat Jadhav

Air India cancel flight of Israel:

इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्राइलला जाणारी आपले उड्डाण रद्द केले आहेत. आमचे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही एअर इंडियाची इस्राइलला जाणारी उड्डाण ही १४ ऑक्टोबर पर्यंत रद्द केली असल्याची माहिती एअरलाइन्सकडून देण्यात आलीय. (Latest News)

पॅलेस्टाईन भीषण युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. हमासने शनिवारी इस्राइलवर हजारो क्षेपणास्त्र डागली होती. त्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्राइलने आज केलेल्या हल्ल्यात शेकडो पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. रॉयटर्स ने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ३१३ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत . तर २००० नागरिक जखमी झाले आहेत. शनिवारच्या हमासच्या हल्ल्यात ४०० इस्रायली नागरिक ठार झाले आहेत.

दोन्ही देशातील युद्ध चिघळलं असून सुरक्षेच्यादृष्टीकोनातून एअर इंडियानं विमानांची उड्डाण रद्द केली आहेत. एअरलाइन्सकडून १४ ऑक्टोबरपर्यंत ही उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. या काळात ज्या प्रवाशांनी तिकीट बुक केले असेल त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचं आश्वासन एअर इंडियाकडून देण्यात आलंय.

एअर इंडियाकडून दर आठवड्याला इस्राइलमधील तेल अवीवच्या दिशेने पाच उड्डाणं करण्यात येतात. याआधी शनिवार 7 ऑक्टोबर रोजीचे फ्लाईट क्रमांक AI 139 आणि परतीचे फ्लाईट AI 140 जे नवी दिल्ली ते तेल अवीव उड्डाण करणार होते, ते देखील रद्द करण्यात आले होते. दरम्यान हमासने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईन विरोधात युद्ध पुकारलं आहे. शत्रूला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असंदेखील त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT