Syria News  Twitter
देश विदेश

Syria : सीरियाची राजधानी दमिश्क स्फोटाने हादरलं; इस्रायलने क्षेपणास्त्र डागले, १५ जणांचा मृत्यू

भूकंपाने हादरलेला सिरिया इस्रायलने क्षेपणास्त्र डागल्याने हादरला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भूकंपाने हादरलेला सिरिया इस्रायलने क्षेपणास्त्र डागल्याने हादरला आहे. रविवारी इस्रायलने सीरियाची राजधानी दमिश्कमधील निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र डागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर क्षेपणास्त्र डागत मोठा हल्ला केला. इस्रायलने (Israel) थेट रहिवाशी इमारतीवर हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर अनेक जण हल्ल्यात जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भूकंपाने हादरलेल्या सीरियावर (Syria) इस्रायलने क्षेपणास्त्र डागल्याने संकटात आणखी भर पडली आहे

दरम्यान, शुक्रवारी देखील सीरियावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ५३ लोकांचा मृत्यू झाल होता. या हल्ल्यासाठी इसिस या दहशतवादी संघटनेला जबाबदार ठरविण्यात आलं होतं.

४७ नागरिक आणि ७ सैनिकांचा झाला होता मृत्यू

स्थानिक वृत्तामाध्यम स्टेट टीव्हीच्या माहितीनुसार, पूर्व वाळवंटात अल-सोखना शहरात इसिस दहशतवादी हल्ल्यात ५३ जणांचा मृत्यू झाल होता. या हल्ल्यात ४६ नागरिक आणि ७ सैनिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील मृतकांचे मृतदेह रुग्णालयात आणले होते. 'सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स'ने शुक्रवारी हल्ल्याची सूचना दिली होती.

सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या कारवाईत ISIS चा म्होरक्या ठार

दरम्यान, अमेरिकन हवाई दल, कमांडो आणि रीपर ड्रोन यांनी काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये (Syria) एक मोठी लष्करी कारवाई केली होती.

इस्लामिक स्टेटचा कमांडर इब्राहिम अल- हाश्मी अल- कुरेशी हा ठार झाला. अमेरिकेच्या हवाई हल्ल्या दरम्यान हाशिमीने स्वत:ला बॉम्बने उडवले होते. या हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता.

सीरियामध्ये ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल- हाशिमी अल- कुरैशी याला ठार मारल्याचा दावा अमेरिकेने गुरुवारी केला होता. स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT