Middle East crisis saam tv
देश विदेश

Israel Lebanon conflict: जगात पुन्हा युद्धाचा भडका उडाला; भीषण हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू

Middle East crisis: इस्रायल-लेबनान सीमेजवळ तणाव वाढला असून हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धविराम असूनही संघर्ष वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मिडल ईस्टमध्ये पुन्हा एकदा तणावाचं सावट गडद झालं आहे. इस्रायल आणि लेबनान यांच्या सीमेजवळ परिस्थिती पुन्हा चिघळताना दिसते आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवारी दक्षिण लेबनानमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला, तर 37 जण जखमी झाले आहेत.

सीजफायर लागू झाल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात भीषण दिवस असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लेबनानमधून डागण्यात आलेले हिज्बुल्लाह या संघटनेचे तीन ड्रोन वायुसेनेने हवेतच पाडले. हे ड्रोन वेस्टर्न गलीली भागात सायरन वाजल्यानंतर ट्रॅक करण्यात आले होते. मात्र, ते इस्रायलच्या सीमेत प्रवेश करण्याआधीच नष्ट करण्यात आले, अशी माहिती लष्कराने दिली आहे.

संशयित ड्रोनही पाडला

याशिवाय, आणखी एक संशयित ड्रोन दक्षिण लेबनानच्या हवाई क्षेत्रातच पाडण्यात आला. या भागात इस्रायली सैनिक तैनात आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार, कोणताही ड्रोन इस्रायलच्या हद्दीत घुसू शकला नाही.

या पार्श्वभूमीवर इस्रायल डिफेन्स फोर्सेसने दक्षिण लेबनानमधील काही गावांतील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर IDF ने हिज्बुल्लाहच्या सदस्यांवर आणि त्यांच्या ठिकाणांवर लक्ष्य करत हवाई हल्ले केल्याचं सांगितलं.

IDF चा दावा आहे की, ही ठिकाणं त्यांच्या सैनिकांवर हल्ले करण्यासाठी वापरली जात होती. तसेच, लेबनानमधून झालेल्या ड्रोन हल्ल्यात IDF चा 19 वर्षीय जवान ठार झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

बीबीसीच्या अहवालानुसार, हिज्बुल्लाहने इस्रायलच्या दिशेने तीन ड्रोन पाठवले होते, मात्र ते सीमा ओलांडण्याआधीच पाडण्यात आले. दोन्ही देशांदरम्यान 16 एप्रिलपासून एक सीजफायर लागू आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी हा करार आणखी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. या करारानुसार, इस्रायलला आत्मरक्षणासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार आहे.

एका सरकारी बैठकीत बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं की, IDF सध्या लेबनानमध्ये ॲक्टिव्ह असून पूर्ण ताकदीने कारवाई करत आहे. हिज्बुल्लाहच्या हालचालींमुळे युद्धविरामाचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला देशात सर्वाधिक उष्ण, पारा थेट ४७ अंशावर, राज्यातील या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

Summer Heatwave Protection Tips: राज्यात उष्णतेचा पारा वाढला, स्वत:ची व कुटुंबाची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Accident News : जालन्यात अपघाताचा थरार, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

SCROLL FOR NEXT