Indian tourists wait at Dubai airport after flights were cancelled amid escalating Israel-Iran conflict, leaving several Maharashtra travellers stranded. saam tv
देश विदेश

Israel-Iran War: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे पश्चिम आशियात अडकले महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक; यादी आली समोर, कोण-कोणत्या जिल्ह्यातील आहेत पर्यटक?

Maharashtra Tourists Stuck: इस्रायल-इराण संघर्षामुळे हजारो भारतीय पर्यटक दुबई आणि सौदी अरेबियामध्ये अडकलेत. उड्डाणे रद्द झाल्यामुळे ते विमानतळांवर अडकले आहेत. त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

Bharat Jadhav

  • इस्रायल-इराण संघर्षामुळे पश्चिम आशियातील उड्डाणे रद्द.

  • दुबई आणि सौदी अरेबियामध्ये हजारो भारतीय पर्यटक अडकले.

  • महाराष्ट्रातील पर्यटकांची जिल्हानिहाय यादी समोर.

इस्रायल आणि इराणमधील युद्ध पेटलं असून पश्चिम आशियामधील अनेक देशामधील विमान उड्डाण रदद करण्यात आली आहेत. याचा फटका भारतीय नागरिकांना बसलाय. भारतातील हजारो पर्यटक दुबई आणि सौदी अरबमध्ये अडकली आहेत. तेथील विमानतळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेकडो पर्यटक दुबई आणि सौदी अरेबियामध्ये अडकलेत. स्थानिक वृत्तानुसार हे पर्यटक सुट्टीवर किंवा तीर्थयात्रेसाठी गेले होते. परंतु विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे त्यांना घरी परतता येत नाहीये. दुबई आणि अबू धाबीमधील एअर पेस बंद झाल्यामुळे जागतिक विमानसेवा विस्कळीत झाली आहे. स्थानिक सूत्रांनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पर्यटक भारतात प्रवास करू शकत नाहीत आणि विमानतळांवर अडकून पडलेत.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पर्यटक परदेशात अडकले

जळगाव: दुबईमध्ये ६२ पर्यटक

सांगली: दुबईमध्ये ३० पर्यटक

सोलापूर: दुबईमध्ये ४३ पर्यटक

नागपूर: सौदी अरेबियामध्ये ४३ पर्यटक

कोल्हापूर: दुबईमध्ये १०० पर्यटक

संभाजी नगर: दुबईमध्ये १५० पर्यटक

ठाणे: दुबईमध्ये २५ पर्यटक

लातूर-नाशिक-धाराशिव: दुबईमध्ये २५-३० पर्यटक

हे पर्यटक विमानतळावरील हॉटेलमध्ये थांबलेत. मध्य-पूर्व शहरात युद्ध पेटल्याने अनेक हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. एअर इंडियाने युएई, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे त्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरही पर्यटक अडकलेत

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंडिगो आणि एअर इंडियाने युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत. जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय केंद्र असलेल्या दुबईमध्ये सध्या बंदचा सामना करावा लागत आहे, यामुळे हजारो प्रवाशांवर परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Mumbai: साकीनाका मॅनहोल दुर्घटना; मुंबई महापालिकेचे ४ अधिकारी तडकाफडकी निलंबित

दारू पिऊन गुरूजी झिंगाट, थेट शाळेत येऊन तोऱ्यात बसला! पालकांचा पारा चढला, VIDEO

SCROLL FOR NEXT