Israel Iran war saam tv
देश विदेश

इस्त्राईलचा इराणच्या अणूसाठ्यांवर हल्ला आता अणुयुद्धाचा भडका उडणार? जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग?

Historical parallel: जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे... त्याला कारण ठरलंय इस्त्राईल- इराण युद्ध... याच युद्धामुळे अणुयुद्धाचे ढग जमा झालेत.. तेच पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Omkar Sonawane

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या विध्वंसक अणुबॉम्बमुळे लाखो लोकांचा मृत्यू आणि कित्येक पिढ्या अपंग झाल्या...आता पुन्हा जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे...रशिया युक्रेन युद्ध त्याला कारण ठरलंय इस्त्राईलने ड्रोन आणि मिसाईलने थेट इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रावर केलेले हल्ले....एवढंच नाही तर इस्त्राईली सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केलेत.. त्यात इराणचे 13 लष्करी टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञ मारल्याचा दावा इस्त्राईलने केलाय...

एकीकडे मध्य पुर्वेत इस्त्राईल इराण युद्धाचा भडका उडाला असतानाच दुसरीकडे रशिया आणि युक्रेनने 30 दिवसांच्या युद्धविरामानंतर युद्धाला सुरुवात केलीय...तर युक्रेनने केलेल्या हल्ल्याला रशियाने विध्वंसक उत्तर दिलंय... त्यामुळे मध्य पूर्वच नाही तर युरोपातही युद्धाचे ढग गडद होत चाललेत....

तर इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीननं तैवानवर कब्जा करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेससेथ यांनी दिलीय... त्यावर ट्रम्प यांनी चीनला इशारा दिलाय...

अहंकार आणि वर्चस्व वादातून इस्त्राईल विरुद्ध पॅलेस्टाईन, लेबनॉन, इराण असा तर युक्रेन विरुद्ध रशिया आणि चीन विरुद्ध तैवान असा संघर्ष सुरुय... या देशांनी संपूर्ण जगाला वेठीस धरलंय. या 4 देशांपायी 140 देश युद्धात भरडले जातील आणि जगाला विध्वंसाच्या खाईत लोटतील. या संभाव्य तिसऱ्या युद्धात थोडथोडकं नव्हे तर तब्बल

1,660 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणारेय. त्यामुळे पुन्हा एकदा जगाला शांततेचा, अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी युद्ध नको तर बुद्ध हवाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ- नांदेड 'या' दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला, पैनगंगा नदीला पूर

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT