इज्रायलच्या कंपनीने (Israel company) एक आगळावेगळा प्रोडक्ट बनवला आहे. या डिवाईसच्या माध्यमातून भिंतीच्या पलीकडचे पाहता येणार आहे. एवढंच नाही तर या डिवाईसच्या मदतीनं भिंतीच्या बाहेरील सर्व गोष्टींची माहिती मिळवता येणार आहे. जाणून घेवूयात या पोर्टेबल डिवाईस (Portable Device) बद्दल सविस्तर माहिती.
भिंतीच्या पलीकडचं दाखवणारे गॅजेट्स (Gadgets) तुम्ही सिनेमात आणि कार्टून शो मध्ये पाहिले असतील. एका कंपनीने असाच एक डिवाईस बनवला आहे, ज्यांचं मदतीनं तु्म्ही भिंतीच्या पलीकडेही पाहू शकता. इज्रायल बेस्ड फर्मने Camero-Tech ने हा डिवाईस तयार केला आहे. या पोर्टेबल आणि हाय परफॉर्मन्स डिवाईसचा नाव Xaver-1000 आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या डिवाईसच्या मदतीनं तुम्हाला भिंतीच्या पलीकडे काय आहे, याची माहिती मिळेल. xaver 1000 ला बनवणारी Camero-Tech फर्म Samy Katsav Group चे भागिदार आहेत. ही कंपनीला ग्लोबल फ्रंटलाईन डिफेंस, लॉ इन्फोर्समेंट सॉल्यूशन, मरीन इंफ्रास्ट्रक्चर आणि प्रॉपर्टी डेव्हलोपमेंट सॉल्यूशनसाठी प्रसिद्ध आहे. Xaver 1000 या डिवाईसच्या माध्यमातून डिफेन्स फोर्सेस आणि लॉ इन्फोर्समेंट एजन्सीला ऑपरेशन्समध्ये मदत होईल.
'ही' आहे प्रोडक्टची खासीयत
Xaver सीरिजचा यापूर्वी आलेल्या व्हर्जनचा जगभरातील जवळपास ५० देशांची फोर्स वापर करत आहे. Xaver 1000 या डिवाईसमध्ये AI बेस्ड लाईव्ह टार्गेट ट्रॅकिंग सिस्टम आहे. याचसोबत डिवाईसमध्ये 3D 'Sense-Through-The-Wall' टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीनं भिंतीच्या पलीकडे असणारी व्यकी, स्टॅटिक ऑब्जेक्टची माहिती मिळते.
तसंच भिंतीच्या दुसऱ्या बाजुला असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणाचीही माहिती मिळण्यात मदत होते. एवढच नाही तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीच्या हालचालींबद्दलही या डिवाईसच्या मदतीनं माहिती मिळू शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. दरम्यान, Xaver 1000 मध्ये 10.1 इंच एवढा टच स्क्रिन डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा थेट संपर्क युजर इंटरफेससोबत केला गेला आहे. तसंच ही टेक्नोलॉजी संपूर्णपणे रेडिएशन विरहीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.