Shruti Vilas Kadam
रणवीर सिंगचं कॉलेजमध्ये आहाना देओलसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र काही काळात ती त्याला सोडून आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनमध्ये गेल्याचं रणवीरने एका मुलाखतीत सांगितलं.
रणवीर सिंगने स्वतः एका शोमध्ये सांगितलं की, तो एकाच वेळी तीन मुलींना डेट करत होता. पण यापैकी कुणाशीही त्याचं नातं फार काळ टिकलं नाही.
‘बँड बाजा बारात’मधील केमिस्ट्रीमुळे रणवीर आणि अनुष्काच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असल्याचं म्हटलं जात होतं.
‘लूटेरा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि सोनाक्षीमध्ये जवळीक निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. मात्र दोघांनी हे नातं कधीच जाहीर केलं नाही.
‘लेडीज vs रिकी बहल’ आणि ‘किल दिल’मध्ये एकत्र काम करत असताना रणवीर आणि पारिणीती यांच्यातील घनिष्ठतेमुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवा पसरल्या होत्या. रणवीरने मात्र तिला फक्त चांगली मैत्रीण म्हटलं.
काही रिपोर्ट्सनुसार रणवीरने पॅरिसमध्ये असताना एका विदेशी मुलीला डेट केलं होतं. मात्र तिची ओळख समोर आलेली नाही.
रणवीर सिंग अनेक अभिनेत्रींशी लिंकअपमध्ये चर्चेत राहिला, पण दीपिका पदुकोणच्या आधी त्याचं कोणतेही नातं दीर्घकाळ टिकलेलं नाही.