Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

Shruti Vilas Kadam

वारी म्हणजे पावित्र्याची अनुभूती

सावनी रविंद्रने वारीला पवित्रतेचं प्रतीक म्हटलं आहे. विठुरायाच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी जसा तल्लीन असतो, तसाच भाव तिनेही व्यक्त केला.

Savaniee Ravindrra | Saam Tv

पहिल्यांदाच वारकरी म्हणून सहभाग

आषाढी वारीत पहिल्यांदाच वारकरी म्हणून सहभागी होण्याचा योग यंदा जुळून आला, हे तिला अतिशय विशेष वाटलं.

Savaniee Ravindrra | Saam tv

स्वतः गाडी चालवत फलटण गाठलं

सावनीने स्वतः गाडी चालवत फलटण येथे जाऊन वारीत सहभाग घेतला आणि तिचा अनुभव "सावनी रविंद्र" या यूट्यूब चॅनेलवर व्लॉगद्वारे शेअर केला.

Savaniee Ravindrra | Saam Tv

पारंपरिक मराठमोळा लूक

नाकात नथ, केसात गजरा, साडी अशा पारंपरिक मराठमोळ्या वेशात सावनी वारीत सहभागी झाली, जो तिच्या चाहत्यांसाठीही आकर्षण ठरला.

Savaniee Ravindrra | Saam Tv

श्रद्धा आणि भावनेचा अनुभव

सावनी म्हणाली की, “वारकरी बनणं ही केवळ इच्छा नव्हे, विठुरायाचं बोलावणं आलं कीच सेवा घडते.” हा अनुभव तिच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

Savaniee Ravindrra | Saam Tv

‘खेळ मांडियेला’ या अभंगाचं वारीत शूटिंग

वारीदरम्यान संत तुकारामांच्या ‘खेळ मांडियेला’ या अभंगाचं शूटिंग सावनीने केलं. वारकऱ्यांनी तिला आपलंसं केल्याने हे शूटिंग अतिशय सहज पार पडलं.

Savaniee Ravindrra | Saam Tv

वारीतील समतेचा अनुभव

सावनीने नमूद केलं की वारीत कोणताही धर्म, जात, भाषा याचा अडसर नसतो, आणि प्रत्येकाच्या मुखावर हरिनाम असतो – हीच खरी वारीची सुंदरता आहे.

Savaniee Ravindrra | Saam Tv

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Sara Ali Khan | Saam Tv
येथे क्लिक करा