Israel Hamas War Latest News  Saam TV
देश विदेश

Israel Hamas War : इस्रायलकडून सलग चौथ्या दिवशी हमासवर हवाई हल्ला; १९ पॅलेस्टिनी जागीच ठार, अनेक जखमी

Israel Hamas War Latest News : इस्रायलने पुन्हा एकदा हमासच्या दक्षिण गाझामधील पॅलेस्टिनी भूभागाला लक्ष केलंय. या बॉम्ब हल्ल्यात १९ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Satish Daud

इस्रायल आणि हमास या दोन देशात मागील वर्षभरापासून घमासान युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सातत्याने बॉम्बहल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. मंगळवारी इस्रायलने पुन्हा एकदा हमासच्या दक्षिण गाझामधील पॅलेस्टिनी भूभागाला लक्ष केलंय. या बॉम्ब हल्ल्यात १९ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याशिवाय हवाई हल्ल्यात डझनभर लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हमासकडून (Israel Hamas War) या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या ४ दिवसांत इस्रायलने केलेला हा सलग चौथा हल्ला आहे.

मात्र, या हल्ल्याबाबत इस्रायलकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हमासच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला (Air Strike) दक्षिणेकडील खान युनिस शहराजवळील अबासन येथील अल-अवदा शाळेच्या गेटवर झाला. हमास संचालित प्रदेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले की या हल्ल्यांमध्ये किमान १९ लोक मारले गेले.

यापूर्वीचे हमासवर झालेल्या तीन हवाई हल्ल्यांची जबाबदारी इस्रायलने स्वीकारली होती. या तिन्ही हल्ल्यांमध्ये शाळेत लपलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले होते. दुसरीकडे हमासने मात्र इस्रायलच्या या दाव्याचे खंडन केले आहे. शाळेत फक्त निर्वासित लोक असून कोणतेही दहशतवादी लपले नसल्याचं हमासने म्हटलंय.

दरम्यान, शनिवारी देखील हमासच्या मध्य गाझामधील नुसिरतमध्ये संयुक्त राष्ट्र संचालित अल-जौनी शाळेवर इस्रायली लष्कराने हल्ला केला होता. ज्यामध्ये सुमारे १६ लोक मारले गेले होते. युनायटेड नेशन्स फॉर पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सी UNRWA ने सांगितले की, इस्रायली हल्ल्याच्या वेळी २,००० लोक शाळेत आश्रय घेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT