Palestinian President Saam Tv
देश विदेश

Israel and Hamas : पॅलेस्टाइनच्या राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यावर प्राणघातक हल्ला; ताफ्यावर अंधाधुंध गोळीबार

Palestinian President : सन ऑफ जंदाल या दहशतवादी संघटनेने राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर गोळीबार केलाय.

Bharat Jadhav

Palestinian President :

गाझापट्टीत इस्राइल आणि हमासमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध चालू आहे. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. याचदरम्यान वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर अंधाधुंध गोळीबार झाला. या जीवघेण्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास हे थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी सन ऑफ जंदाल या दहशतवादी संघटनेने घेतलीय. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, सन ऑफ जंदाल या दहशतवादी संघटना आहे. या संघटनेनेकडून राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यावर हल्ला केला. राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी इस्राइलविरुद्धात युद्धाची घोषणा करावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी संघटनेने राष्ट्राध्यक्षांना २४ तासाचा वेळ दिला होता. जर युद्धाची घोषणा केली नाहीतर त्यांना जीवे मारण्याची धमकी या दहशतवादी संघटनेने दिली होती. दहशतवादी संघटनेने दिलेली मुदत काल संपली, त्यानंतर आज राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहशतवाद्यांकडून राष्ट्राध्यक्षांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एका घराजवळ असलेल्या वाहनाजवळ काही बंदूक हातात घेतलेले व्यक्ती दिसत आहेत. या दहशतवाद्यांच्या गोळीबारात राष्ट्राध्यक्षांचा अंगरक्षक जखमी झाला. दरम्यान इस्राइलचे सैन्य गाझापट्टीत शिरले असून ते आता जमिनीवरून हमासच्या दहशतवाद्यांना ठार करतील.

यानंतर युद्ध शिगेला पोहोचणार असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान या हमास आणि इस्राइलमधील युद्ध सुरू होऊ एक महिना झालाय. गाझावर अनिश्चित काळापर्यंत सुरक्षा ठेवेल, असं इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणालेत. त्याच्या या विधानामुळे त्यांना गाझापट्टीवर नियंत्रण मिळवायचे आहे, असं मानलं जातंय. हमासद्वारे ओलीस ठेवलेल्या २४० नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्राइल काही काळासाठी हल्ला करणार नसल्याचं नेतन्याहू एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

SCROLL FOR NEXT