पाकिस्तान ड्रोनने पाठवले भारताला 11 टिफिन बॉम्ब; निशाण्यावर काही RSS चे नेते?
पाकिस्तान ड्रोनने पाठवले भारताला 11 टिफिन बॉम्ब; निशाण्यावर काही RSS चे नेते? Saam Tv
देश विदेश

पाकिस्तान ड्रोनने पाठवले भारताला 11 टिफिन बॉम्ब; निशाण्यावर काही RSS चे नेते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : दहशतवाद संदर्भामधील Terror Alert एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ऑगस्टपासून आत्तापर्यंत नोव्हेंबर 2021 पर्यंत ४ महिन्यामध्ये भारतीय सीमेवर २५ हून अधिक ड्रोन पाकिस्तानकडून पाठवण्यात आले आहेत. भारताच्या सर्व व्यवस्था आणि प्रयत्नांना न घाबरता पाकिस्तान सरकार Pakistan आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आपल्या कृत्यांपासून परावृत्त होण्यास तयार नाही.

हे देखील पहा-

या ड्रोनमधून ड्रग्ज, शस्त्रे आणि टिफिन- बॉम्ब पाठवण्यात आले आहेत. अलर्टनुसार हे दहशतवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS नेत्यांना लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी दहशतवाद्यांचे लक्ष्य असणार आहेत, असे पुरावे समोर आले आहेत. ISI चे दहशतवादी संधी मिळताच सर्वांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी दहशतवाद्यांचे लक्ष्य राहू शकतात, असे पुरावे सापडले आहेत. ISI चे दहशतवादी संधी मिळताच सर्वांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्यानांमध्ये उभारण्यात आलेल्या शाखांमध्ये या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असताना हे प्रयत्न अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ११ टिफिन बॉम्ब जप्त करुन निकामी करण्यात आले आहेत.

भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या या पावलामुळे पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर संस्थेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. अलीकडच्या काळामध्ये आता भारतीय गुप्तचर संस्थेने आणखी एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. चिंता वाढवण्याविषयी हा इशारा भारतीय सुरक्षा यंत्रणांना सतर्क करणार आहे. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०२१ दिवशी मध्यरात्री २ दिवस अगोदर पठाणकोट मधील भारतीय लष्करी छावणीजवळ करण्यात आलेला हल्ला देखील पाकिस्तानी कारस्थानांचाच एक भाग होता.

ज्यामध्ये अज्ञात सूत्रधारांनी मोटारसायकल स्वारांच्या मदतीने ग्रेनेड हल्ला केल्याची घटना घडली आहे. ISI असे हल्ले घडवून आणण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. गुप्तचर विभागाने काही दिवसाअगोदरच भारतीय एजन्सींना त्याची शक्यता आणि संबंधित अलर्ट दिले जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Problem : झोपेच्या कमतरतेमुळे जडू शकतात गंभीर आजार, शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करुन पाहा

Santosh Juvekar Post : संतोष जुवेकरचा फोटो थेट हेअर सलूनच्या बोर्डावर, अभिनेत्याने सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

Dhananjay Munde News| राष्ट्रवादीने आबा पाटलांना मुख्यमंत्री का नाही केले? धनंजय मुंडे यांचा सवाल

Solapur Politics: शरद पवारांचे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सोलापूरमध्ये नेमकं घडतंय तरी काय?

Pune Narendra Modi: नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पगडी साकारली! नेमकं वैशिष्ट्य काय?

SCROLL FOR NEXT