Oil tankers transporting crude oil as global markets react to tensions affecting energy supply routes. 
देश विदेश

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

Oil Supply Crisis : सरकारी सूत्रांनुसार एलपीजी किंवा एलएनजीची कमतरता नाहीये. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची कमतरता नाहीये. भारत इतर पुरवठादारांशी संपर्कात आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानेही भारताला गॅस विकण्याची ऑफर दिली आहे.

Bharat Jadhav

  • इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक तेल संकटाची चर्चा सुरू झाली आहे.

  • होर्मुझ सामुद्रधुनी काही काळ बंद झाल्यामुळे तेल टँकर अडकले होते.

  • भारत सरकारने देशात इंधनाचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल संकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती, आता हाती आलेल्या माहितीनुसार इराणने सामुद्रधुनी पुन्हा सुरू केली आहे. ज्यामुळे अनेक देशांचे तेल टँकर अडकले आहेत. भारताने गुरुवारी स्पष्ट केले की ते ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत खूप चांगल्या स्थितीत आहे. सध्याचा साठा चांगला आहे आणि दररोज तो पुन्हा भरला जातोय.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, एलपीजी किंवा एलएनजीची कोणतीही कमतरता नाहीये. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नाहीये. भारत इतर पुरवठादारांशी देखील संपर्कात आहे. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानेही भारताला गॅस विकण्याची ऑफर दिलीय. यासह भारत इतर स्रोतांचाही शोध घेत आहे. अलिकडेच भारताने युएई आणि अमेरिकेसोबत नवीन करार केलेत.

सूत्रांनी सांगितले की, "भारत १९५ एमएमएससीएमडी गॅस आयात करतो, त्यापैकी कतार फक्त ६० एमएमएससीएमडी पुरवतो. भारताकडून गॅस खरेदीसाठी इतर बाजारपेठांचा शोध घेतला जातोय. भारत कच्चे तेल आणि एलपीजी खरेदी करण्यासाठी प्रमुख तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करत आहे." याव्यतिरिक्त भारत जहाजावरील विमा मिळविण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करत आहे. ऊर्जा परिस्थितीचा दररोज दोनदा आढावा घेतला जात आहे.

दरम्यान रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा देश नेहमीच भारताला कच्चे तेल पुरवण्यास तयार आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटादरम्यान पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत तीव्र वाढ झाल्याबद्दल वाढती चिंता व्यक्त होतेय. त्यादरम्यान रशियाकडून करण्यात आलेल्या विधानामुळे भारतावरील संकट दूर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

२ तासांपूर्वी मित्रांसोबत फोटो काढला, स्टेटसला ठेवला; पण त्यांनीच केली हत्या, संभाजीनगरात खळबळ

खिशात पैसा खेळता राहणार, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार

Kidney Failure Signs: किडनी फेल होण्याचे पहिले लक्षण कोणते?

SCROLL FOR NEXT