Manasvi Choudhary
किडनी हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रित करणे, रक्तातील लाल पेशी तयार करणे ही मुख्य कार्ये किडनीमार्फत होतात.
मात्र किडनीच्या या सुरूवातीच्या लक्षणांकडे लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होतो.
ही लक्षणे वेळीच ओळखल्यास किडनीचे आजार टाळता येऊ शकतात. जर मूत्रपिंड योग्यरित्या काम करत नसेल तर त्याचा परिणाम शरीरावर होतो
किडनीचे फिल्टर खराब होते तेव्हा रक्त पेशी मूत्रात गळती होते यामुळे युरिनमध्ये रक्त येते हे किडनीच्या समस्येचे संकेत असू शकते.
जर तुमची किडनी युरिन तयार करण्यास प्रतिबंध होत असेल तर किडनी निकामी होण्याचे लक्षण असते.
युरिनमध्ये कॅल्शियम, युरीक अॅसिड आणि ऑक्झालेट या घटकाचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.