Shruti Vilas Kadam
काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही आणि डिहायड्रेशनपासून बचाव होतो.
काकडीची थंड प्रवृत्ती शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते, त्यामुळे उकाड्यात ताजेतवाने वाटते.
काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास ती उत्तम पर्याय ठरते.
काकडी खाल्ल्याने त्वचा हायड्रेट राहते, ग्लो येतो आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
काकडीमध्ये फायबर असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
काकडी डिटॉक्सिफायिंग फूड आहे, जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते.
काकडीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयासाठीही फायदेशीर आहे.