Shruti Vilas Kadam
उन्हाळ्यात कॉटन फॅब्रिक सर्वात जास्त वापरले जाते. हे घाम शोषून घेतं आणि त्वचेला थंड ठेवतं.
लिनन हलके, breathable आणि लवकर सुकणारे असतात. त्यामुळे उष्ण हवामानात ते शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात.
टाइट कपड्यांऐवजी सैल आणि आरामदायी कपडे घातल्यास हवा खेळती राहते आणि घाम कमी होतो.
पांढरा, पेस्टल किंवा हलके रंग सूर्याची उष्णता कमी शोषतात, त्यामुळे शरीर थंड राहते.
मलमल आणि रेयॉन हे हलके आणि मऊ असल्याने उन्हाळ्यात खूप आरामदायी वाटतात.
पॉलिस्टर, नायलॉनसारखे कपडे उष्णता अडकवतात आणि जास्त घाम येतो, त्यामुळे ते टाळावेत.
संड्रेसेस, ओव्हरसाइज टी-शर्ट, लूज कुर्ते यांसारखे फ्लोई कपडे उन्हाळ्यात स्टाइलिश आणि आरामदायी दोन्ही ठरतात.