Iranian warship attack संग्रहित छायाचित्र
देश विदेश

IRIS Dena : भारतामधून निघालेल्या युद्धनौकेवर पाणबुडीतून हल्ला, ८७ जणांचा मृत्यू, ६७ बेपत्ता

IRIS Dena warship submarine attack near Sri Lanka : भारतामधील आंतरराष्ट्रीय सागरी सरावानंतर परतणाऱ्या इराणच्या आयरिस देना युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ पाणबुडी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू झाला असून ६७ जण बेपत्ता आहेत. श्रीलंका नौदलाने काही जणांना वाचवले आहे.

Namdeo Kumbhar

Iranian warship attack : आखाती देशात सुरू असलेले इस्त्राइल-अमेरिका आणि इराण युद्ध आता भारताच्या दारात आले आहे. श्रीलंकेजवळ हिंद महासागरात अमेरिकेच्या पाणबुड्यांनी इराणच्या आयरिस देना या युद्धनौकेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६७ जण अद्याप बेपत्ता आहे. श्रीलंका नौदलाने आयरिस देना या जहाजावरील ३२ जणांना वाचवले आहे. इराणची युद्धनौका दोन आठवड्यापूर्वी भार आंतरराष्ट्रीय सागरी सरावासाठी विशाखापट्टणमला आले होते.

आयरिस देना ही इराणची युद्धनौका सरावानंतर मायदेशी परतली होती. पण त्याचवेळी अमेरिकेने पाणबुडीतून पाणतीर डागून जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत ८७ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय.श्रीलंकेच्या गॅले शहरापासून ७५ किमीवर असताना युद्धनौकेवर हल्ला झाला. पाणबुडीतून पाणतीर सोडून युद्धनौका बुडवण्याची दुसऱ्या महायुद्धानंतर ही पहिलीच वेळ आहे.

ती युद्धनौका भारतात आलेली -

दोन आठवड्यापूर्वी भारताने आंतरराष्ट्रीय सागरी सरावाचे आयोजन केले होते. त्यासाठी इराणची आयरिस देना ही युद्धनौका विशाखापट्टणमला आली होती. भारताने आयोजित केलेल्या या सरावात या युद्धनौकेने सहभाग घेतला होता. या सराबात ७२ देशांच्या युद्धनौकांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर युद्धनौका मायदेशात परत निघाली होती. हिंद महासागरात श्रीलंकेच्या गॅले शहराच्या जवळ गेल्यानंतर अमेरिकेच्या पाणबुडीतून यावर हल्ला कऱण्यात आला.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, 'हा हल्ला अमेरिकेच्या पाणबुडीने केला होता. आमचे लक्ष इराणी जहाज आयरिस देना होते.' श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ यांनी संसदेत सांगितले की जहाजात अंदाजे १८० लोक होते. हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापासून सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर बुडाले. बुडण्यापूर्वी आयरिस देना या जहाजाने मदतीसाठी संदेश पाठवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT