Global oil markets react as Iran-US peace deal reopens Hormuz Strait, easing supply concerns. saam tv
देश विदेश

इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबलं, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Iran Us Peace Deal Hormuz Strait Open Oil Prices Impact India: इराण-अमेरिका यांच्यात शांतता करार होऊन होर्मुझ जलमार्ग खुला करण्यावर सहमती झाल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. त्यामुळे जागतिक तेल बाजारही स्थिरता येणार आहे....मात्र ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय अर्थकारणावर कसा परिणाम होणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक शांतता कराराची घोषणा केलीये. दोन्ही देशांमध्ये 14 अटींवर शांतता करार करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. विशेष म्हणजे, अमेरिकेनं आपला मित्रदेश इस्त्रायलला विश्वासात न घेता परस्पर करार केल्याचं बोललं जातंय. अंतरिम कराराच्या मसुद्यात इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाच्या अटींवर एकमत झालंय.

शांतता कराराच्या मसुद्यात काय?

इराण कोणत्याही दुसऱ्या देशाकडून अणुशस्त्रे विकसित करणार नाही तसंच मिळवणार नाही

इराण आपल्या सध्याच्या अणुकार्यक्रमात कोणतेही मोठे बदल करणार नाही

इराण युरेनियमचे संवर्धन करणार नाही, नवीन अणुकेंद्रांचा विस्तार करणार नाही

इराण तात्काळ होर्मुझचा जलमार्ग सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली करेल

होर्मुझचा जलमार्ग खुला झाल्यानंतर, अमेरिका इराणी बंदरांवरील नौदलाची नाकेबंदी उठवणार

अमेरिका इराणच्या तेल निर्यातीवरील निर्बंधही तात्पुरते शिथिल करेल

अमेरिका 25 अब्ज डॉलर्स किमतीची जप्त केलेली इराणी मालमत्ता परत करेल

तर दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल 4 टक्क्यांनी घसरण झालीये. त्यामुळे पुढील काळात सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

काय परिणाम होणार?

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहण्यास मदत होणार

वाहतूक खर्च कमी झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घसरण्याची शक्यता

तेल आयातीचा खर्च कमी झाल्यानं देशाचा परकीय चलन साठा मजबूत होऊ शकतो

भारताच्या रुपयाचं मूल्य स्थिरावण्याचा अंदाज

पेट्रोकेमिकल्स, प्लॅस्टिक आणि खत उद्योगांचा खर्च कमी झाल्यानं उत्पादनाला गती

महत्त्वाचं म्हणजे, इराण-अमेरिकेतील ऐतिहासिक शांतता करारामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा भडका शांत होणार असला, तरी याचे भांडवली बाजारवरही सकारात्मक पडसाद उमटले आहेत. सेन्सेक्समध्ये 1300 अंकांपर्यंत तेजी दिसून आलीये. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे देशात महाग झालेलं पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुन्हा स्वस्त होणार का? सामान्यांपर्यंत युद्धबंदीचा लाभ पोहचणार का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रावर महादुष्काळाचं संकट, राज्यात 31 ऑगस्टपर्यंतच पाणीसाठा, शेतीसाठी पाणी पुरवठा बंद

शिंदे-नाईंकांमध्ये पुन्हा मानापमान नाट्य, शिदेंना डावललं, नाईकांची गाडी अडवली

Akola : तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धसका; भीतीनं शहरात विक्रीच बंद

Fact Check: 2 कोटींच्या नोटांचा पाऊस? 2 लाखांचे केले 2 कोटी?

Maharashtra News Live Update: पुण्यातील 'त्या' मिठाई दुकानाचा परवाना अखेर रद्द

SCROLL FOR NEXT