US President Donald Trump issues fresh warning to Iran after rejecting key conditions, raising fears of renewed conflict. saam tv
देश विदेश

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

Iran-US Conflict : इराणवर पाच दिवस हल्ले करणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या ट्रम्प यांनी अवघ्या काही तासांत इराणला पुन्हा एकदा इशारा दिलाय. इतकचं काय तर अमेरिकेनं इराणच्या दोन अटीही धडकावून लावलेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या खोटारडेपणामुळे युद्ध कसं पेटणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला चकित करत इराणविरुद्ध पाच दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे इराण- अमेरिका संघर्ष थांबणार असल्याचे संकेत मिळत असताना ही चर्चा खुद्द ट्रम्प यांनी औटघटकेची ठरवली आणि काही तासातच घुमजाव करत इराणला थेट इशारा दिला.

'जर दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरली, तर इराणवर पुन्हा बॉम्बफेक करू.. इतकचं काय तर इराणमध्ये सत्तांतर होईल, व्हेनेझुएलाप्रमाणे इराणमध्येही एक नेता शोधला जाईल..आम्ही अशा व्यक्तीशी बोलत आहोत, ज्याला मी सर्वात आदरणीय आणि खरा नेता मानतो. ते इराणमधील सर्वोच्च नेते नाहीत. त्यांच्याबद्दल कोणीही काहीही ऐकलेले नाही.' अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिलीय.

दुसरीकडे युद्ध थांबवण्यासाठी इराणनं अमेरिकेपुढे ज्या दोन अटी ठेवल्या होत्या त्या अटी ट्रम्प प्रशासनाने फेटाळून लावल्या.

पहिली अट होती, अमेरिकेने इराणला युद्धाची नुकसान भरपाई द्यावी.

तर दुसरी अट होती, अमेरिकेनेच पहिल्यांदा इराणवर हल्ला केल्याचं कबूल करावं. मात्र या दोन्ही अटी अमेरिकेनं अमान्य केल्यानं इराण युद्ध सुरुच ठेवणार आहे... त्यामुळे इराण अमेरिका संघर्ष आता कोणत्या वळणावर पोहचतो आणि ट्रम्प यांचा हाताशी असणारा इराणमधील तो नेता कोण? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT