Ayatollah Ali Khamenei wife dies Saam tv
देश विदेश

खामेनेईंच्या पत्नीचंही निधन, हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

Ayatollah Ali Khamenei wife dies : इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. त्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या.

Vishal Gangurde

खामेनेई यांचा जागीच मृत्यू झाला

अमेरिका इस्रायल हल्ल्यात इराणचे अनेक नेते मारले गेले

या हल्ल्यात खामेनेई यांची पत्नी देखील हल्ल्यात ठार झाल्यात

इराण-इस्रायल युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई हे ठार झाले आहेत. तर त्यांच्या पत्नी या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज सोमवारी त्यांची प्रोणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, अयातुल्लाह अली खामेनेई यांची पत्नी मन्सुरे खोजस्ते बागेरजादेह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इराणची तसनीम न्यूज एन्जसीने दावा केला आहे की, सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची पत्नी अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. दोन्ही देशाच्या हल्ल्यात इराणचे सर्वेसर्वा खामेनई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज सोमवारी त्यांच्या पत्नी खोजस्ते बागेरजादेह यांचा मृत्यू झाला आहे.

युद्धामुळे पश्चिम आशियातील स्थिती गंभीर झाली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणच्या अनेक भागांवर हल्ला केला. त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या कार्यालयावरही हल्ला केला. यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई ठार झाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराण अणुबॉम्ब तयार करक आहे. अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी इराणने मिसाइल विकसित करत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणी जनतेला खामेनेई सरकारच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केलं आहे. तसेच स्वत:चं सरकार तयार करण्याचे आवाहन केलं आहे.

दुबईत अडकले भारतीय नागरिक

तत्पूर्वी, युद्धाचा फटका जगभरातील नागरिकांना बसला आहे. युद्ध सुरू असलेल्या काही देशात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. देशासहित महाराष्ट्रातील हजारो नागरिक दुबईत अडकले आहेत. या नागरिकांकडून मदतीची विनंती केली जात आहे. दुबईत अडकलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT