इराण-अमेरिका चर्चेवर अनिश्चितता; इराणचा अमेरिकेवर अविश्वास व्यक्त, तणाव कायम. 
देश विदेश

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Iran vs America: चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी इराणने अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अद्याप कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही असेही म्हटले आहे. टोकाच्या मागण्यांविरुद्ध तेहरानने इशारा दिल्याने तणाव वाढला आहे.

Bharat Jadhav

  • इराण-अमेरिका चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तारीख निश्चित नाही

  • इराणने अमेरिकेला अविश्वासघातकी म्हटलं

  • अतिरेकी मागण्यांवर इराणचा इशारा

इराण आणि अमेरिकेदरम्यान दुसऱ्यांदा शस्त्रसंधीची चर्चा होणार आहे. पाकिस्तानातील इस्लामाबादेत झालेल्या पहिल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे दोन्ही देशाचे प्रतिनिधी चर्चेसाठी दुसऱ्यांदा बैठक करणार आहेत. शांतता करार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या चर्चेसाठी जागा आणि तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती अमेरिकेडून देण्यात आले आहे. मात्र त्याच दरम्यान इराणने शांती वार्तेबाबत मोठं विधान केलं आहे. आपल्या शत्रूवर आमचा विश्वास नसल्याचं इराणनं, म्हटलंय. तसेच चर्चेबाबत काहीच गोष्टी निश्चित झालं नाहीत असं विधान केलं आहे.

अमेरिकेशी चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांनी सांगितले की, दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही. अल जझीराच्या वृत्तानुसार, जर अमेरिकेने पुन्हा कोणत्याही अतिरेकी मागण्या केल्या, तर त्यांचे पालन करणे अशक्य होईल. दरम्यान इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सांगितले की, इराण वाटाघाटी आणि युद्ध या दोन्ही परिस्थितींसाठी तयार आहे.

आम्हाला शत्रूवर विश्वास नाही -इराण

प्रेस टीव्हीने गालिबाफ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "आम्ही शत्रूवर विश्वास ठेवत नाही. आता आम्ही येथे बसलो असतानाही युद्ध भडकू शकते. सशस्त्र दल प्रत्यक्ष युद्धासाठी पूर्णपणे तयार आहेत." संसदेच्या अध्यक्षांनी हे नाकारले की, सुरू असलेल्या चर्चेमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड होऊ शकते. चर्चेमुळे सशस्त्र दल अप्रस्तुत आहेत, असा आमचा विश्वास आहे.

याउलट रस्त्यावरील सामान्य नागरिकांप्रमाणेच आमचे सशस्त्र दलही तयार आहेत, असे गालिबाफ म्हणाले. याआधी पाकिस्तानी चॅनल जिओ टीव्हीने वृत्त दिले होते की, अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी पुढील आठवड्याच्या अखेरीस इस्लामाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, रविवारीही असे घडण्याची कोणतीही संकेत मिळाली नाहीत. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस चर्चा होण्याची शक्यता कमी आहे असे म्हणता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT