Iran launches coordinated missile and drone strikes across multiple Middle East nations amid escalating regional tensions. Saam Tv
देश विदेश

अखेर खामेनींच्या मृत्यूचा बदला घेतला, इराणचा 9 देशांवर हल्ला

Iran Revenge Strikes Middle East Latest Updates: खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणनं नवी रणनिती आखलीय... इराणनं शेजारील 9 देशांवर हल्ला केलाय... मात्र अमेरिका आणि इस्रायलवरील संताप इराण शेजारील देशांवर का काढतोय? कोणत्या 9 देशांवर इराणनं हल्ला केलाय?

Suprim Maskar

अमेरिकेनं केलेल्या खामेनींच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या इऱाणनं इस्रायलसह आता मध्य-पूर्वेतील देशांवर हल्ले सुरु केलेत...इराणनं आतापर्यंत अमेरिकेची मदत करणाऱ्या 9 देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केलाय..त्यात इराणने युएईवर तब्बल 137 क्षेपणास्त्रे आणि 2029 ड्रोन हल्ले केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय...खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणनं कोणत्या देशांवर हल्ला केलाय...

इराणनं युएईतील दुबई शहराला लक्ष्य करत लक्झरी हॉटेल बुर्ज अल अरबवर हल्ला केला...सौदी अरेबियातील रियाद, कतारमधील दोहा, कुवैतमधील कुवैत सिटी या ठिकाणीही इराणने हल्ला केला... त्यासोबत जॉर्डनमधील मुवाफ्फाक सल्ती एअर बेस आणि बहरीनमधील मनामा या ठिकाणी इराणनं क्षेपणास्त्र डागली... इस्रायल याच्या तेल अवीवमध्ये तर इराकमधील बगदाद आणि सीरियातील स्वेदामध्येही इराणनं हल्ला केलाय...

दरम्यान इराणी हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील विमान सेवा थांबण्यात आलीय...दुंबईत अनेक भारतीय प्रवासीही अडकलेत...मात्र इराणनं खामेनींच्या हत्येनंतर या 9 देशांवर हल्ला का चढवला? पाहूयात...

इराणचा शेजारील देशांवर हल्ला का?

इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिका शेजारील राष्ट्रांचा वापर करत आहे. त्यामुळे या राष्ट्रांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं प्रतिहल्ले सुरू केले आहेत. तर अमेरिकेनं दुबईत 2015 ते 2024 दरम्यान अंदाजे 21.7 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणुक केलीय.. त्यामुळे इराणनं युएई आणि सौदी अरेबियासारख्या श्रीमंत शेजारी देशांना आर्थिक नुकसान पोहोचवण्याची योजना आखत हल्ला केलाय.. दुबईतील पर्यंटन स्थळावरील हल्ल्यामुळे पर्य़टन क्षेत्रावर गदा आणण्याचा इराणचा प्रयत्न...

आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादण्यासाठी या दोन्ही देशांकडून दबावाचं राजकारण होण्याची शक्यता आहे...त्यामुळे खामेनीच्या मृत्यूचा बदला घेताना इराणची आर्थिक कोंडी होण्याचीही शक्यता आहे... महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या संघर्षात भविष्यात नेमकं काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: वरुण चक्रवर्तीच्या गूगलीने शाई होप झोप उडवली; मिडल स्टम्प झाला गूल

Iran-Israel War: इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठा बदल, मोजतबा खामेनेईंकडे देशाची कमान

अमेरिकेच्या क्षेपणास्त्राची जगभरात चर्चा, इराणवर 'ब्लॅक टॉमहॉक' क्षेपणास्त्रानं हल्ला?

Monday Horoscope : सोमवारी 'या' ४ राशींचे नशीब पालटणार; मेष ते मीन, कोणाला मिळणार गूड न्यूज, वाचा राशीभविष्य

महायुद्धाचं भाकीत खरं ठरलं! अमेरिका-इस्रायल-इराणच्या युद्धानंतर बाबा वेंगाच्या आणखी एका भविष्यवाणीनं जगात खळबळ

SCROLL FOR NEXT