Global concern grows as Iran imposes conditions on ships passing through Strait of Hormuz. saam tv
देश विदेश

होर्मुझची सामुद्रधुनी खुली,पण...; घोषणा करताना इराणनं ठेवली अट; भारताच्या जहाजांना परवानगी असणार? अनेक देशांचं टेन्शन वाढलं

Iran On Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करण्याची घोषणा इराणने केली आहे. इतर देश सुरक्षा नियमांचे पालन करून त्या मार्गातून जाऊ शकतात, परंतु शत्रू देशांच्या जहाजांना त्यातून जाण्याची परवानगी नसल्याचं इराणनं म्हटलंय.

Bharat Jadhav

  • इराणने होर्मुझ सामुद्रधुनी अटींसह खुली केली

  • शत्रू देशांच्या जहाजांवर निर्बंध

  • जागतिक व्यापार आणि तेल पुरवठ्यावर परिणाम

आखाती देशांमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. इराण अमेरिका आणि इस्रायलला तडीसतोड देत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी रोखून इराणने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले आहे. त्या जेरीस आलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्यात येईल,अशी धमकी अमेरिकेने दिली आहे.

ट्रम्प यांच्या धमकीनंतर लगेचच इराणने आपले प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यासोबतच अटी लादून अमेरिकेला आणखी एक धक्का दिला. या प्रत्युत्तरातून इराण अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मध्य पूर्वे (पश्चिम-आशिया) तील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे.

इराणने म्हटलं की, होर्मुझची सामुद्रधुनी सर्व देशांच्या जहाजांसाठी खुली आहे. त्यात असे नमूद केले होते की, शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. इराणने स्पष्ट केले की हा मार्ग जगभरातील देशांसाठी खुला आहे, परंतु त्यांच्या शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना त्यातून जाण्यास मनाई असेन.

इराणचा रोख अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशांवर होता. इराणने संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत आणि सौदी अरेबिया यांसारख्या अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या सर्व मध्य पूर्वेकडील देशांना या मार्गापासून दूर राहण्याचा इशारा दिलाय. इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी सांगितले की, शत्रू देशांशी संलग्न नसलेली जहाजे सुरक्षा नियमांचे पालन करून या मार्गातून जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT