Israel Vs Iran Saam Tv
देश विदेश

Israel Iran War: जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण 48 तासांत इस्रायलवर हल्ला करणार? भारत सरकारचा नागरिकांना रेड अलर्ट?

Israel Vs Iran: इराण आणि इस्रायलचे शत्रूत्व नवं नाही. इस्रायल आणि गाझा पट्टीत हमासमध्ये संघर्ष पेटल्यानंतर इराण युद्धात उतरणार, अशी चर्चा होती. मात्र 1 एप्रिल 2024 च्या घटनेमुळे संघर्षाची ठिणगी पडलीय.

साम टिव्ही ब्युरो

Israel Iran War:

इराण आणि इस्रायलचे शत्रूत्व नवं नाही. इस्रायल आणि गाझा पट्टीत हमासमध्ये संघर्ष पेटल्यानंतर इराण युद्धात उतरणार, अशी चर्चा होती. मात्र 1 एप्रिल 2024 च्या घटनेमुळे संघर्षाची ठिणगी पडलीय. सीरीयातील दमास्कस इथं इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात इराणचा एक सर्वोच्च जनरल आणि काही लष्करी अधिकारी ठार झाले. या हल्ल्याचा सूड घेण्याचं वचन इराणच्या नेत्यांनी दिलं होतं.

अमेरीकेनं माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींनी इस्रायलवर हल्ला चढविण्याची योजना आखलीय. मात्र त्यातील राजकीय जोखमीचा ते अंदाज घेतायेत. इराण 100 हून अधिक ड्रोन आणि डझनभर क्षेपणास्त्रांसह एकाच वेळी हल्ल्याची तयारी करतय. दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की अमेरिकन लष्कराचे अधिकारी इस्रायलपर्यंत पोहोचले आहेत. चीन आणि सौदीला फोन करून अमेरिका सलोख्यासाठी प्रयत्न करतय. एवढं करूनही इराणनं प्रत्युत्तर दिल्यास इस्रायलला एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागू शकते.

इराण आणि इस्रायल दीर्घकाळापासून एकमेकांशी छुपं युद्ध लढत आहेत. मात्र, दोन्ही देशांमध्ये कधीही थेट मोठे युद्ध झाले नाही. 1948 मध्ये मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईनच्या जागी इस्रायल नावाचा नवा ज्यू देश निर्माण झाला. मध्यपूर्वेतील बहुतांश मुस्लिम देशांनी इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला. यावेळी, इराण हे तुर्कीनंतर दुसरे मुस्लिम राष्ट्र होते, ज्याने 1948 मध्येच इस्त्राईलला देश म्हणून मान्यता दिली होती.

भारतीयांना खबरदारीचा इशारा

पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे भारतानं मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीयांना खबरदारीचा इशारा दिलाय. इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असंही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या दोन देशांमध्ये राहणा-या भारतीयांनी भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

दरम्यान, जगभरात युद्ध नको, शांतता हवी अशी भूमिका विविध देशांतील नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून घेतली जात आहे. सत्ताधारी नेते त्याची दखल घेणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

Drinking water before bed: झोपण्याआधी किती तास आधी आणि किती पाणी प्यावं? फायदे-तोटे जाणून घ्या

CBSE 12th Exam: सीबीएसईचा ७ देशांसाठी मोठा निर्णय, १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द

Khaja Recipe: सणासुदीला घरच्या घरी कुरकुरीत आणि गोड खाजा करा तयार, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT