Israel Indian Embassy Issued Advisory : इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केलाय. इराणच्या या हल्ल्लानंतर दोन्ही देशात तणाव वाढलाय. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत इस्रायलमधील भारतीय दूतावासाने रविवारी तेथे राहणाऱ्या नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सुचना जारी केल्यात. स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन देखील दुतावासाकडून करण्यात आले आहे. (Latest News)
दूतावासाने सांगितले की ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दोन्ही अधिकारी आणि प्रवासी सदस्यांच्या संपर्कात आहोत. दूतावासाने आपली 24X7 आपत्कालीन हेल्पलाइन देखील जारी केलीय. त्या भारतीय नागरिकांना दूतावासात नोंदणी करण्याची विनंती करण्यात आलीय.
नोंदणीच्या अर्जामध्ये इतर तपशीलांसह पासपोर्ट क्रमांक, नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, व्यवसाय आणि इस्रायलमधील राहण्याचा पत्ता लिहून द्यावा लागणार आहे. "परिसरातील अलीकडील घटना लक्षात घेता, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना शांत राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटलंय. "दूतावास सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकारी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या संपर्कात असल्याची माहिती या सुचनांमध्ये देण्यात आलीय.
सीरियामधील वाणिज्य दूतावासावरील क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. त्यासाठी इराणने इस्रालयला यासाठी जबाबदार धरले होते. त्यानंतर इराणने शनिवारी रात्री उशिरा इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला. तेहरानने म्हटले आहे की हा स्ट्राइक इस्रायली गुन्ह्यांची शिक्षा आहे. दरम्यान इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या वरिष्ठ कमांडरचा मृत्यू प्रकरणाची जबाबदारी इस्रायलने घेतली नाही तसेच नाकारली सुद्धा नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.