iran blast latest update  Twitter/I
देश विदेश

Iran News: इराण स्फोटाने हादरलं! जनरल कासीम सुलेमानी यांच्या कबरीजवळ झालेल्या स्फोटात ७३ जणांचा मृत्यू

Iran Latest News : इराणमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. इराणचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Iran Explosion News:

इराणमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. इराणचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सुलेमानी यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त शेकडो लोक कबरीजवळ जमा झाले होते. त्याचवेळी स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेत १२० हून अधिक जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

दोन स्फोटाने इराण हादरलं

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी करमान शहरात अल-जमान मशिदीजवळ असलेल्या इराणच्या जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुलेमानी यांच्या चौथ्या स्मृतीदिनावेळीच ही घटना घडली आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'इरिब'च्या वृत्तानुसार, इराणमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. एका व्हिडिओमध्ये रस्त्यावर काही मृतदेह पाहायला मिळत आहे. शेजारी असलेल्या इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेल्या जनरल सुलेमानी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कबरीजवळ शेकडो लोक जमले होते.

इराणमधील वरिष्ठ नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यानंतर सुलेमानी यांना मानणारा मोठा वर्ग होता. इराणमधील स्फोटाच्या घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही लोक या हल्ल्यातील जखमींना मदतीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

कोण होते कासीम सुलेमानी?

कासीम सुलेमानी यांनी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ची विदेशी ऑपरेशन्स शाखा असलेल्या कुड्स फोर्सचे नेतृत्व केलं. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ नेतृत्व केलं आहे. त्यांचा २०२० मध्ये अमेरिकन हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात मोठं यश म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती ! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT