IPS Officer Transfer Saam Tv
देश विदेश

IPS Officer Transfer: ३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडक्या बदल्या, प्रशासकिय वर्तुळात खळबळ

Delhi Police Transfer: दिल्लीतील ३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. नायब राज्यपालांनी बदलीचे आदेश जारी केले.

Priya More
  • दिल्ली पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल

  • दिल्लीमध्ये ३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

  • वर्षा शर्मा यांची नायब राज्यपालांच्या विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती

  • चिन्मय बिस्वाल यांची सहआयुक्तपदी नियुक्ती

  • शिवेंद्रकांत तिवारी यांची अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोठा प्रशासकिय फेरबदल करण्यात आला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. नायब राज्यपाल यांनी पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारसीनुसार या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना करण्याचे आदेश दिले. या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमक्या कुठे करण्यात आल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

आयपीएस अधिकारी वर्षा शर्मा यांची नायब राज्यपालांच्या विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी चिन्मय बिस्वाल यांची सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी शिवेंद्रकांत तिवारी यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. या आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली.

आयपीएस अधिकारी वर्षा शर्मा या २०१० च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. याआधी त्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त- आपत्कालीन गुन्हे शाखा म्हणून काम केले आहे. आयपीएस अधिकारी चिन्मय बिस्वाल हे २००८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तर आयपीएस अधिकारी शिवेंद्रकांत हे २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआधी ते नायब राज्यपालांचे विशेष कार्य अधिकारी होते.

दरम्यान, याआधी १८ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल करण्यात आला होता. नायब राज्यपालांच्या आदेशानंतर ४१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आणि २ डॅनिप्स अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. या सर्व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात यादी देखील समोर आली होती. १८ ऑगस्टनंतर अवघ्या ४ दिवसांत ३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT