मुंबई: लोकप्रिय सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर (Instagram) काल, बुधवारपासून एक हॅशटॅग ट्रेंड होत आहे. जर आपण तो हॅशटॅग इन्स्टाग्राममध्ये सर्च करुन त्या हॅशटॅगवर (Hashtag) क्लिक केलं तर लगेच इन्स्टाग्राम अकाऊंट लॉगआऊट होतं. #embeded असा हॅशटॅग इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या हॅशटॅगवर क्लिक केलं तरी आपलं अकाऊंट आपोआपच लॉगआऊट होतं. काल, दिवसभर हा ट्रेंड इन्स्टाग्रामवर सुरू होता. तर नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. (Instagram embeded Hashtag)
काल, दिवसभर #embeded हा हॅशटॅग इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत होता. अनेक पोस्टमध्ये हा हॅशटॅग शेयर करत यावर क्लिक करण्याचं आवाहन केलं गेलं. या हॅशटॅवर ज्यांनी क्लिक केलं त्यांचे अकाऊंट अचानक लॉगआऊट (Logout) झाले. यामुळे इन्स्टाग्राम यूजर्सचा गोंधळ उडाला. ज्यांना आपल्या अकाऊंटचा पासवर्ड माहिती होता, त्यांनी पासवर्ड परत टाकून आपलं अकाऊंट पुन्हा लॉग इन केलं. पण अनेक यूजर्सना त्यांच्या इन्स्टाग्रामचा पासवर्ड माहिती नव्हता त्यांना मात्र एकतर पासवर्ड रीसेट करावा लागला किंवा त्यांच अकाऊंट गमवावं लागलं आहे. यामुळे अनेकांना मनःस्ताप सहन करावा लागला आहे. (Instagram Logout News)
याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. परंतू काही टेक्नोसॅव्ही यूट्यूबर्सच्या मते हा हॅशटॅग विशिष्ट प्रोग्रॅमिंगद्वारे (Coding) बनवला गेला आहे. त्यामुळे जेव्हा एखादा यूजर #Embeded या हॅशटॅगवर क्लिक करतो, तेव्हा इन्स्टाग्रामच्या अॅममध्ये टेक्निकल ग्लिच (Glitch) किंवा एरर (Error) येतो. यामुळे इन्स्टाग्रामचे अॅप हे अचानक लॉगआऊट होते. यामुळे आपल्या अकाऊंटला धोका निर्माण होऊन ते हॅकही होऊ शकते. त्यामुळे अशा हॅशटॅगवर क्लिक न करण्याचं आवाहन जाणकारांनी केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.