INS Sunayna Saam Tv
देश विदेश

INS Sunayna: 'आयएनएस सुनयना' जहाजाने दिली दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट

indian navy news: आयएनएस सुनयना जहाजाने दिली दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट

साम टिव्ही ब्युरो

INS Sunayna: भारतीय नौदलाच्या सुनयना जहाजाने 21-25 ऑगस्ट 23 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन या बंदराला भेट दिली. क्षेत्रातील सर्वांसाठी विकास आणि सुरक्षा दृष्टिकोनाला अनुसरून सागरी भागीदारांसोबतचे भारताचे संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट होती.

या भेटीदरम्यान, भारतीय नौदल आणि दक्षिण आफ्रिकेतील नौसैनिक, व्यावसायिक आणि प्रशिक्षण संवाद, डेक भेटी आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले.  (Latest Marathi News)

नौसंचालन, अग्निशमन, हानी नियंत्रण आणि जहाजावर शोध व जप्ती अशा विविध बाबींवर संयुक्त प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली होती. ‘वसुधैव कुटुंबकम’ संदेशाचा प्रचार करत, दक्षिण आफ्रिकेच्या नौदलकर्मींसह आयएनएस सुनयना जहाजावर एक संयुक्त योग सत्रही आयोजित करण्यात आले.

अभ्यागतांसाठी 23 ऑगस्ट रोजी जहाज खुले ठेवण्यात आले होते. डर्बनमधील भारताच्या महा-वाणिज्यदूत डॉ. थेल्मा जॉन डेव्हिड यांनी जहाजाला भेट दिली आणि जहाजाचे कार्य आणि क्षमता जाणून घेतल्या.

जहाजाने संयुक्तता आणि आंतरकार्यक्षमतेला चालना देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाचे जहाज एसएएस किंग सेखुखुने सोबत सागरी भागीदारी सराव (MPX) केला. सागरी सहकार्य आणि भागीदारी वाढवण्याच्या दिशेने दोन्ही नौदलांनी वचनबद्धता व्यक्त केली असून ही भेट यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nysa Devgan : अजय देवगन-काजोलची लाडकी लेक झाली ग्रॅज्युएट, नीसाच्या पदवी प्रदान समारंभाचा VIDEO समोर

Pali Crime News : रायगडच्या पालीमध्ये सशस्त्र दरोडा; रात्रीच्या अंधारात पाच घरांमध्ये घातला धुमाकूळ

Mumbai - Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अपूर्ण; टोल नाके मात्र पूर्ण, शरद पवार गट आक्रमक | VIDEO

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे अन् काय खाऊ नये

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

SCROLL FOR NEXT