Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांवर अन्याय होतोय- राहुल गांधी Saam Tv
देश विदेश

Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांवर अन्याय होतोय- राहुल गांधी

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर घटनेकडे आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे

विहंग ठाकूर

वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी सरकारवर टीका करताना प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, 'हिंदुस्थान चे  सरकार पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ला करत आहे. शेतकऱ्यानंकडून पद्धतशीरपणे हिसकावले जात आहेत राहुल म्हणाले की, काही काळापासून भारतातील शेतकऱ्यांवर सरकारकडून आक्रमण होत आहेत. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे, त्यांची हत्या केली जात आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांबद्दल बोलले जात आहे, त्यांच्या मुलाबद्दल बोलले जात आहे. या सरकारमध्ये पोस्टमॉर्टम व्यवस्थित होत नाही. सरकारच्या विरोधात बोलल्यास जेलमध्ये  टाकले जाते.

हे देखील पहा-

पंतप्रधान मोदींच्या लखनौ भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, 'काल पंतप्रधान लखनौमध्ये होते, ते लखीमपूर खेरीला का जाऊ शकले नाहीत?' राहुल आपल्या आजच्या दौऱ्याच्या नियोजनावर म्हणाले की, ते आज काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करतील. ते म्हणाले की कलम 144 लागू करण्यात आल्यामुळे अशा परिस्थितीत फक्त तीन लोक जातील आणि त्याबद्दल पत्र लिहिले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगू की यूपी सरकारने राहुल गांधींना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली नाही.

राहुल गांधी म्हणाले की मला तिथे जाऊन परिस्थिती बघायची आहे. ते म्हणाले, 'विरोधकांचे काम दबाव निर्माण करणे आहे, आम्ही दबाव निर्माण केला तर कारवाई केली जाते. आम्ही दबाव निर्माण करू नये आणि खुनींनी पळून जावे अशी सरकारची इच्छा आहे. जर आम्ही हाथरसमध्येही आवाज उठवला नसता तर हेच  घडले असते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT