मुंबई : ऐन दिवाळी सणामध्ये परत एकदा महागाईचा भडका उडला आहे. आता घरगुती वापराच्या सिलिंडर भावात वाढ करण्यात आली आहे. याचवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात देखील परत वाढ करण्यात आली आहे. ऑइल मार्केटिंग कॉसने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या भावात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी अनुदानित १४.२ किलो सिलिंडर भावात १५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यानंतर, आता दिल्लीमध्ये देखील एलपीजी सिलिंडर भावात ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये भाव प्रति सिलिंडर झाला आहे.
हे देखील पहा-
दरम्यान, २ दिवसांपूर्वी व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडर भाव ४३ रुपयांनी वाढले होते. आता भाववाढ करण्यात आल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा प्रवास १ हजार रुपयांच्या दिशेने सुरु झाली आहे. मात्र, १ ऑक्टोबरला पेट्रोलियम कंपन्यांनी नवे भाव जाहीर केले होते. त्यामध्ये घरगुती सिलिंडरचे भाव स्थिर ठेवण्यात आले आहे. तर व्यावसायिक सिलिंडरचे भाव हे ४३ रुपयांनी वाढविण्यात आले आहे. यामुळे व्यावसायिक सिलिंडरपोटी १८८१.२३ ऐवजी १९२४.२३ रुपये भरावे लागणार आहेत. याचा थेट फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना मोठा बसणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पुन्हा वाढ
Petrol, diesel prices: याचवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आता डिझेल लवकरच शंभरी ओलांडणार असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल भाव हे २९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महाग झाले आहे. लिटरमागे डिझेल मुंबईमध्ये ९९.१७ रुपये तर पेट्रोल १०८.९६ रुपये भाव करण्यात आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.