Rising CNG and milk prices put additional financial pressure on common citizens amid growing inflation concerns in India. saam tv
देश विदेश

महागाईचा बॉम्ब फुटणार? कोणत्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

Impact Of Cng Price Hike On Common People In India: महागाईच्या वणव्यात सामान्य जनता होरपळतेय. सीएनजीचे दर वाढल्याने वाहनधारक हैराण झालेत. तर दुसरीकडे दुधाच्या दरवाढीचा चटका बसलाय. त्यामुळे देशात महागाईचा बॉम्ब नेमका कसा फुटणार? पाहूयात य़ा स्पेशल रिपोर्टमधून...

Girish Nikam

महागाईचा बॉम्ब आता सर्वसामान्यांवर फुटणार का अशी परिस्थिती देशात निर्माण झालीय. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे एलपीजी आणि सीएनजी दरात वाढ झाली.

मुंबईत CNG आता 82 रुपयांवरून थेट 84 रुपये प्रति किलो

रिक्षा युनियनची 1 रुपया तर टॅक्सी युनियनची 2 रुपये दरवाढीची मागणी

मुंबईतील सुमारे 12 लाख CNG वाहनांना दरवाढीची झळ

या सीएनजी किंमत वाढल्यानंतर रिक्षा चालकांनीही दर वाढवून देण्याची मागणी केलीय. दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ करण्यात आल्यानं व्यावसायिक सिलेंडरची किंमत थेट 3 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी ही दर वाढलेत. त्यातच भर म्हणून गुरुवारपासून दुधही महागलंय.

अमूल दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झालीय. पशुखाद्य, पॅकेजिंग आणि इंधनाचा खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेतलाय. अमूलनं दरवाढ जाहीर केल्यानंतर मदर डेअरीनंही आपल्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केलीय.

दुसरीकडे केंद्र सरकारनं सोनं-चांदीवरील आयात शुल्कात वाढ केल्यानं . सोन्याच्या दरात 12 हजार 700 रुपयांची वाढ झाली. तर एक किलो चांदी 2 लाख 90 हजारापर्यंत गेलीय. घाऊक महागाई दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजेच 8.3% वर पोहोचलाय. आखाती युद्धात आता सर्वसामान्य जनताही होरपळली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

भजन करताना चक्कर आली अन्..; थोर समाज प्रबोधनकार रामधन महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन| VIDEO व्हायरल

पुण्याला बॉम्बनं उडवण्याचा कट? हॉस्पिटलमध्ये कुणी ठेवला बॉम्ब?

सरकारची निर्यात बंदी, साखर उद्योग अडचणीत, 3 महिन्यांतच फिरवला निर्यातीचा निर्णय

भारतात लॉकडाऊन लागणार? इंधन संकटामुळे देश ठप्प होणार?

SCROLL FOR NEXT