Army Chief Manoj Pandey News
Army Chief Manoj Pandey News Saam TV
देश विदेश

Terrorist Attack: नियंत्रण रेषेवर घुसखोरी वाढली, दहशतवाद ठेचायला भारतीय जवान सज्ज; लष्करप्रमुखांची माहिती

Satish Daud-Patil

Army Chief Manoj Pandey News

जम्मू-काश्मीरमधील पश्चिम सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अनेक भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. नियंत्रण रेषेवर युद्धविराम असूनही घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत, अशी माहिती लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, आगामी काळात पाकिस्तानातून काश्मीरसह इतर ठिकाणी घुसघोरी वाढू शकते. त्यांना सडेतोड उत्तर देण्याची भारताची तयारी असल्याचंही लष्करप्रमुखांनी सांगितलं आहे. ७६व्या लष्कर दिनानिमित्त मनोज पांडे बोलत होते.

भारताने उत्तर सीमेवर क्षमता वाढवण्यासाठी आम्ही अनेक ठोस पावले उचलली आहेत. त्यासाठी आधुनिक उपकरणे आयात केली आहेत. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या शस्त्रांचाही समावेश आहे. आधुनिक पायाभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे प्राधान्य आहे, असंही लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सांगितले.

सीमावर्ती भागात प्रमुख पायाभूत सुविधा विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या भागात सुरक्षा दलांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. देशातून दहशतवादाचा नायनाट करायचा असून त्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत, असेही मनोड पांडे यांनी सांगितले.

दरम्यान, २२ डिसेंबरला जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात दहशतवाद्यांनी भारतीय लष्काराच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ जवान शहीद, तर दोन जवान जखमी झाले होते. या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या सडेतोड उत्तर दिले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT