बांगलादेशातून भारतात घुसखोरी, ओळख लपविण्याकरिता भारतीय महिलेशी लग्न Saam Tv
देश विदेश

बांगलादेशातून भारतात घुसखोरी, ओळख लपविण्याकरिता भारतीय महिलेशी लग्न

या काळात इस्लामिक स्टेट ही अतिरेकी संघटना भारतात आपले जाळे वाढवत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलकाता : देशासह जगावर मागील दीड वर्षापासून कोरोनाचे Corona सावट आहे. या संकट काळामध्ये जगभरात लाखो लोकांचा मृत्यू Death झाला आहे. भारतामध्ये देखील कोरोना प्रचंड फोफावला माजला आहे. या काळात केंद्र सरकार Central Government आणि विविध राज्य सरकारकडून संसर्ग कमी करण्याकरिता लॉकडाऊन Lockdown लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरी राहणे यावेळी पसंत केले आहे.

पण या काळात इस्लामिक स्टेट ही अतिरेकी Terrorist संघटना भारतात India आपले जाळे वाढवत आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीचा फायदा घेऊन जेएमबी, अंसारुल्लाह गुट आणि आयएस IS या अतिरेकी संघटना देशामधील तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

हे देखील पहा-

कोलकाता Kolkata पोलिसांनी Police काही दिवसांअगोदर दक्षिण किनाऱ्यावर हरिदेबपूर Haridebpur येथील ३ संशयितांना बेड्या ठोकले आहेत. पुढे चौकशी केली असता, ते जेएमबी या अतिरेकी संघटनांचे संचालक असल्याची माहिती मिळाली आली. या अतिरेक्यांची नजीउर रहमान पावेल, मेकैल खान आणि रबीउल इस्लाम अशी अटक करण्यात आल्याची नावे आहे. या ३ अतिरेक्यांनी योग्य संधी साधत बांगलादेश Bangladesh मधून भारतात घुसखोरी केली होती.

विशेष म्हणजे ते कोलकात्यामधील एका हायप्रोफाईल भागात राहत असत, अशी माहिती त्यांच्या चौकशी मधून समोर आली आहे. भारतात घुसरखोरी करुन हायप्रोफाईल परिसरात राहणारे अतिरेकी हे देशामधील बेरोजगार तरुण- तरुणांना हेरत आहेत. ते त्यांचे ब्रेनवॉश करायचे. विशेष म्हणजे ते प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन चॅट करुन तरुण- तरुणींचे ब्रेनवॉश करत आहेत. यानंतर ते या तरुणांची अतिरेकी संघटनेत भरती करत आहेत.

या गोष्टीवर अधिकाऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे इस्लामिक स्टेट ही संघटना भारतात जाळे वाढवण्याकरिता सर्वोतोपरी कट आखत आहेत. या संघटनेने भारतामधील १२ राज्यात तरुणांना आपल्याकडे आकर्षित केल्याचा दावा करण्यात येत आहे. या संघटनेचे लष्कर- ए- तोयबा आणि अल- कायदा सारख्या संघटनांशी याचा संबंध आहे. भारतात आपली विचारधारा पसरविण्यासाठी या अतिरेकी संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड वापर करत आहे.

भारतात घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना आपली ओळख लपविण्यासाठी लग्न हे सोपे माध्यम आहे. या माध्यमामधून त्यांना भारताचा नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोठी मदत होत आहे. तसेच स्थानिक पातळीवर रुळण्यास देखील मदत होते. यामुळे लग्न हे त्यांचे एकप्रकारे सुरक्षा कवच बनतं आहे. आरोपी इतके हुशार असतात की ते आपली ओळख लपवण्याकरिता धर्म परिवर्तनही करत आहेत.

कोलकाता पोलिसांनी पकडलेला अतिरेकी पावेल याने याच माध्यमातून आपली ओळख लपवलेली होती. त्याचे जयराम बेपारी असे हिंदू नाव आहे. त्याने आणि त्याचा सहकारी मेकैल खान उर्फ शेख शब्बीर यांनी हरिदेवपूर भागात २ महिलांसोबत मैत्री केली होती. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर पुढच्या महिन्यात लग्नाची योजना बनवलेली होती.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

SCROLL FOR NEXT