Indore-Pune Bus Accident Saam Tv
देश विदेश

Indore-Pune Bus Accident: इंदूर-पुणे बसला अपघातावेळी नेमके काय घडले?

मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला मोठा अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली.

साम टिव्ही ब्युरो

धार: मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला मोठा अपघात (Accident) झाला. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये ५५ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. ही बस इंदूरमधून पुणेसाठी निघाली होती. नर्मदा नदीच्या पुलावरुन ही बस १०० फूट उंचावरुन कोसळली आहे.

हा अपघात का झाला याच्या दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पुलावरचा मोठा खड्डा चुकवताना हा अपघात झाला असावा किंवा ओव्हरटेक करत असताना पुलाचे रोलींग तुटून ही बस खाली कोसळली असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. या अपघातात आता मृतांचा आकडा वाढणार असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. (Indore-Pune Bus Accident)

ही बस सकळी साधारण ८ वाजता इंदूवरुन निघाली. आग्रा-मुंबई महामार्गावर हा अपघात (Accident) झाला. हा रस्ता इंदूर महाराष्ट्राला जोडतो. अपघात ज्या ठिकाणी झाला तिथून इंदूर ८० किलोमीटर अंतरावर आहे. ज्या पुलावरुन ही बस कोसळली तो पूल धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) येथे आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

या बसला अपघात (Accident) ज्या ठिकाणी त्या ठिकाणापासून १२ किलोमीटर आधी त्या बसमधील प्रवासी एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले होते. झाला निघाल्यानंतर काहीवेळाने एका हॉटेल एमएच ४० एन ९८४८ ही बस सकाळी ९ ते ९.१५ वाजता खलघाटापूर्वी १२ किमी अंतरावर दुधी बायपासच्या काठी एका हॉटेलमध्ये थांबली होती. यावेळी या बसमधील १२-१५ प्रवाशांनी चहा घेतला. बाकीचे प्रवासी बसमध्ये होते. या बसमध्ये साधारण ३० ते ३५ प्रवासी बसमध्ये होते असा अंदाज हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे.

विभाग नियंत्रकांचा दुजोरा

या दुर्घटनेला एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर तसेच अमळनेरच्या आगारप्रमुख अर्चना भदाणे यांनी दुजोरा दिला. म.प्र.तील बलकवाडा येथील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. (Indore-Pune Bus Accident)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT