Blackmail Tragedy Saam Tv News
देश विदेश

बलात्काराची धमकी, २३ लाखांची खंडणी; हनी ट्रॅपमध्ये क्लब मालक अडकला, शेवटी संपवलं आयुष्य

Blackmail Tragedy: इंदूरमधील शोशा क्लबचे मालक भूपेंद्र रघुवंशी यांची आत्महत्या. विवाहित महिला इति तिवारीकडून सतत ब्लॅकमेलिंग व २३ लाखांची उकळी. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत महिलेलाच जबाबदार धरलं.

Bhagyashree Kamble

  • इंदूरमधील शोशा क्लबचे मालक भूपेंद्र रघुवंशी यांची आत्महत्या

  • विवाहित महिला इति तिवारीकडून सतत ब्लॅकमेलिंग व २३ लाखांची उकळी

  • आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत महिलेलाच जबाबदार धरलं

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे

इंदूर शहरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका क्लब व्यावसायिकानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. भूपेंद्र रघुवंशी असं शोभा क्लबच्या मालकाचे नाव आहे. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत त्यानं एका विवाहित महिलेचं नाव लिहिलं आहे. त्यानं त्याच्या मृत्यूसाठी विवाहित महिलेला जबाबदार धरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला भूपेंद्र यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवून बदनामी करण्याची धमकी देत होती, तसेच महिनाभरापूर्वीच २३ लाख रुपये उकळले होते, अशी माहिती समोर आली आहे. अन्नपूर्णा पोलीस ठाण्याचे टीआय अजय नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र यांनी रात्री उशिरा विषप्राशन केले. सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भूपेंद्र रघुवंशी यांचा विजयनगर भागात शोशा नावाचे क्लब आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा जबाब घेण्यात आला. कुटुंबीयांच्या मते, इति तिवारी नावाची महिला त्यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ब्लॅकमेल करत होती. ती कधी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची, तर कधी बदनामी करण्याची धमकी देत होती. एवढेच नव्हे, तर ती फ्लॅट आणि गाडीची मागणीसुद्धा करत होती.

तिनं आतापर्यंत भूपेंद्रकडून २३ लाख रूपये उकळले. इति तिवारी पूर्वी इंदूरमध्ये राहत होती. काही दिवसांनंतर ती नोकरीनिमित्त मुंबईला गेली. मात्र, तिथे जाऊनही तिचं ब्लॅकमेलिंग सुरूच होतं. ती दारूच्या नशेत भूपेंद्रला फोनवर शिवीगाळ करून धमक्या देत असे. या सर्व छळामुळे त्रस्त होऊन भूपेंद्रने आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Education Scam: 680 शिक्षकांना अटक होणार? बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले

Donald Trump : ट्रम्प C*#@#a...! अमेरिकन तज्ज्ञाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिल्या हिंदीत शिव्या, VIDEO

Manoj Jarange: फडणवीस आडकाठी करत असल्याचा जरांगेंचा आरोप; शिंदे-जरांगे साथ साथ?

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर

Maratha Reservation: धक्कादायक! जरांगेंच्या आंदोलनापूर्वी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; आरक्षणावरून सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT