Indonesia Sulawesi Island Landslide Yandex
देश विदेश

Indonesia Landslide: मुसळधार पावसाचा कहर; इंडोनेशियाच्या बेटावर भूस्खलनामुळे १४ जणांचा तर अफगाणिस्तानमध्ये ३३ जणांचा मृत्यू

Rohini Gudaghe

इंडोनेशियाच्या बेटावर भूस्खलन

इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर १४ एप्रिल रोजी मोठी दुर्घटना घडली. सुलावेसी बेटावर मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले, त्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण (Indonesia Sulawesi Island Landslide) बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ताना तोराजा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आजूबाजूच्या डोंगरावरून चार घरांवर चिखल पडला होता.

इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दक्षिण सुलावेसी प्रांतातील ताना तोराजा भागात शनिवारी रात्री (१३ एप्रिल) मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आजूबाजूच्या टेकड्यांवरून चार घरांवर चिखल (Indonesia Sulawesi Island) पडला. यापैंकी एका घरात कौटुंबिक कार्यक्रम सुरू होता. स्थानिक पोलीस अधिकारी गुनार्डी मुंडू यांनी सांगितलं की, दुर्घटनेनंतर लोकांना वाचवण्यासाठी या गावांमध्ये शोध मोहिमेत सैनिक, पोलीस आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.

१४ एप्रिल रोजी पहाटे आठ वर्षांच्या मुलीसह दोन जखमींना वाचवण्यात बचाव कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते (Indonesia Landslide) अब्दुल मुहारी यांनी सांगितलं की, बचाव कर्मचाऱ्यांनी रविवारी दुपारपर्यंत मकाले गावातून अकरा आणि दक्षिण मकाले येथून तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.

याशिवाय तीन वर्षांच्या मुलीसह आणखी तिघांचा शोध सुरू आहे. मुहारी म्हणाले की, पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक मार्ग आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

अफगाणिस्तानामध्ये मुसळधार पाऊस

अफगाणिस्तानामध्ये मुसळधार पावसामुळे ३३ लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अफगाणिस्तानामध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत (Heavy Rain In Afghanistan) झालं आहे. अफगाणिस्तान सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलं की, अफगाणिस्तानमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २७ जण जखमी आहेत.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे तालिबान प्रवक्ते अब्दुल्ला जनान सॅक यांनी १४ एप्रिल रोजी सांगितलं की, काबूल आणि देशभरातील इतर अनेक ठिकाणी अचानक पूर आला आहे. त्यामुळे (Heavy Rain) उद्ध्वस्त झाली तर सुमारे 200 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतजमीन आणि रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT