Indonesia Boat Tragedy: Blaze on Passenger Ferry Leaves 41 Missing saam tv
देश विदेश

मोठी दुर्घटना ! २५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण आग; ५ जणांचा मृत्यू ४१ जण बेपत्ता

Indonesia Boat Fire: मदुरा बेटाजवळ 250 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या KMP Mutiara Sentosa 2 या प्रवासी बोटीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण अद्याप बेपत्ता आहेत.

Bharat Jadhav

  • पूर्व जावामधील मदुरा बेटाजवळ 250 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण आग लागली.

  • दुर्घटनेत किमान 5 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण अद्याप बेपत्ता आहेत.

  • 'केएमपी मुतियारा सेंटोसा 2' या प्रवासी बोटीवर ही दुर्घटना घडली.

इंडोनेशियातील पूर्व जावामधील मदुरा बेटाजवळ रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. २५० प्रवासी आणि कर्मचारी असलेली 'केएमपी मुतियारा सेंटोसा २' (KMP Mutiara Sentosa 2) या प्रवासी बोटीला अचानक आग लागली. या घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४१ जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच, इंडोनेशियाच्या शोध आणि बचाव पथकांनी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू केली आहे.

सुराबाया ते मकासार प्रवास करताना बोटीला आग

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट सुराबाया येथील तंजुंग पेराक बंदरावरून सुलावेसी बेटावरील मकासार शहराकडे जात होती. प्रवासाला सुरुवात होऊन काही तास झाले होते. त्याचवेळी जहाजाच्या कॅप्टनने जहाजावर आग लागल्याची सूचना दिली. त्यानंतर काही वेळातच, या जहाजाशी असलेला रेडिओ आणि नेव्हिगेशन संपर्क तुटला. सुराबाया शोध पथक आणि मदत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दुर्घटनाग्रस्त बोट सापुदी द्वीपपासून साधरण १९ मैल अंतरावर आहे.

या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओ आणि प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणात पूर्ण बोटीला काळ्या धुरांनी वेढा मारला होता. जहाजावरील अनेक प्रवाशांनी 'लाइफ जॅकेट्स' परिधान केली होती. आगीपासून वाचण्यासाठी ते जहाजाच्या पुढच्या भागाकडे व 'ब्रिज'कडे (नियंत्रण कक्षाकडे) जमले होते.

आपला जीव वाचवण्यासाठी डझनभर प्रवाशांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सुराबाया येथील शोध आणि बचाव कार्यालयाचे प्रमुख नानंग सिगिट यांनी सांगितले की, तात्काळ मदत पुरवण्यासाठी जवळून जाणाऱ्या जहाजांना रवाना करण्यात आले आहे.

ते म्हणाले, "पाण्यात उडी मारलेल्या प्रवाशांना वाचवत आहेत. ''TB Hasnur 26'' (TB Hasnur 26) आणि 'ब्रिटिश मेंटॉर' (British Mentor) ही जहाजे बचाव कार्य करत आहेत.आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या फेरीपर्यंत चार मोठी जहाजे पोहोचली आहेत. यासह मुख्य बचाव जहाज 'एसएआर २४९ परमाडी' (SAR 249 Permadi) देखील घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशेज घाटात तरुणांची हाणामारी; पोलिसांनाही दमबाजी

Walking Benefits: जिमला जाण्याची गरज नाही! रोज ४० मिनिटं चालल्याने मिळतात हे ७ जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Night Sweats : रात्री झोपेत अचानक घाम का येतो? हे कारण वाचून बसेल धक्का

किडनी स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय काय?

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे 5 युनिक पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT