Texas Shopping Mall Firing: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये गोळीबार झाला आहे. टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये ही घटना घडली आहे.या गोळीबारात नऊ जण ठार आणि सात जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)
पोलिसांनी (Police)हल्लेखोराच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं आणि त्यात या हल्लेखोराला ठार केलं आहे.जे लोक जखमी झाले आहेत त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. टेक्सासच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथल्या प्रीमियम आऊटलेट मॉलवर हल्लेखोराने गोळीबार केला.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोक एका शॉपिंग मॉलसमोरील पार्किंगमधून पळताना दिसत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक दिसत आहेत. तर एका व्हायरल व्हिडीओत हल्लेखोराचा चेहराही दिसतो आहे. त्यानंतर त्याला ठार करण्यात आलं आणि त्याच्या मृतदेहाजवळ जी बंदुक आहे ती देखील या व्हायरल (Viral) फोटोंमध्ये दिसते आहे.
कॉलिन काऊंटीचे प्रमुख अधिकारी यांनी टेक्सासमध्ये गोळीबार झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच लोक या घटनेत जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितले आहे.काही लोक अद्याप देखील मॉलमध्ये अडकले असल्याची माहिती कॉलिन काऊंटीचे प्रमुख अधिकारी यांनी दिली आहे.
आमच्या मॉलमध्ये जी घटना घडली त्याचा आम्हाला खेद वाटतो. आमच्या मॉलला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना हे सहन करावं लागलं याबाबत आम्हाला दुःख झालं आहे असं मॉल चालवणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला. तसेच, ही अतिशय त्रासदायक घटना असल्याचं म्हटलं. तसेच, राज्य सरकारच्यावतीने सर्वोतोपरी मतदसेवा सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.