IndiGo Flight saam TV News
देश विदेश

IndiGo Flight: हैदराबादला निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड, ४० मिनिटं आकाशात घातल्या घिरट्या नंतर...; प्रवाशांचा जीव टांगणीला

IndiGo Hyderabad Flight Circles in Air: हैदराबादला निघालेल्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. या विमानाने आकाशात ४० मिनिटं घिरट्या घातल्या. त्यानंतर या विमानाचे तिरुपती विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

Priya More

हैदराबादला निघालेल्या इंडिगो विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. हे विमान तब्बल ४० मिनिटं आकाशात घिरट्या घेत राहिलं. त्यानंतर हे विमान परत तिरूपतीला गेले आणि विमातळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

एयरबस A-321neo नावाचे हे विमान तिरुपती विमानतळावरून रविवारी रात्री ७.४२ वाजता रवाना झाले. पण उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान काही वेळात म्हणजे ८.३४ ला परत विमातळावर परत आले. म्हणजे ४० मिनिटं हे विमानात आकाशातच घिरट्या घालत राहिले.

इंडिगोच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे विमान तिरुपतीहून संध्याकाळी ७.२० वाजता निघणार होते. ते हैदराबादला रात्री ८.३० वाजता पोहोचणार होते. त्या दिवशी हैदराबादला जाणारी ही शेवटची नियोजित फ्लाइट होती. पण नंतर ती रद्द करण्यात आली. सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडिओमध्ये फ्लाइटच्या वेळापत्रकात बदल केल्याबद्दल प्रवाशांनी एअरलाइन कर्मचाऱ्यांशी वाद घातला. एअरलाइनने अद्याप या घटनेवर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नव्हते.

त्यानंतर इंडिगोकडून सोमवारी या प्रकरणावर निवेदन जारी करण्यात आले. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, २० जुलै रोजी तिरुपतीहून हैदराबादला जाणारी इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E-6591 मध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड झाला होता. खबरदारी म्हणून पायटलने विमान परत वळवून तिरुपती विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेतला. विमान सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी आवश्यक चौकशी केली जाणार आहे. या घटनेनंतर सर्व प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार पुढील उपलब्ध फ्लाइटमधून जाण्याचे नियोजन करून देण्यात आले. तसंच फ्लाइट रद्द केल्यावर काहींना तिकीटाचे पैसे परत देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT