आजकाल दाट धुक्यामुळे अनेक विमानं उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतेय. त्यांचा संयमही सुटत आहे. मात्र, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचं सांगितले आहे. सोमवारी इंडिगोच्या विमानातील (Indigo Flight) पायलटला मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. त्या फ्लाइटमध्ये बसलेल्या एका रशियन महिलेनं हा प्रसंग सांगितला आहे. (Latest News)
रशियन मॉडेल इव्हगेनिया बेलस्काया याच फ्लाइटमधून प्रवास करत होती. तिने X या माध्यमावर अनुभव शेअर केला आहे. बेलस्काया म्हणाले की, दिल्ली-गोवा इंडिगो फ्लाइट (६E-२१७५) रविवारी सकाळी साडेसात वाजता उड्डाण करणार होतं. हे फ्लाइट पकडण्यासाठी सर्वजण सकाळी सहा वाजता विमानतळावर पोहोचले होते. पण फ्लाइटला (Indigo Flight) उशीर झाला. आम्ही सगळे विमानतळावर वाट बघू लागलो. आम्ही सुमारे १० तास वाट पाहिली. अखेर प्रतिक्षेनंतर आम्हाला विमानात बसण्याची परवानगी मिळाली. विमानात बसल्यावर पुन्हा २-३ तास थांबलो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पायलटला मारहाण केल्याचं कारण
बेलस्किया पुढे म्हणाले की, यानंतर सर्व प्रवाशांचा संयम सुटू लागला. प्रत्येकजण केबिन क्रूकडून वेळेबद्दल प्रश्न विचारू लागला, तेव्हा भांडण (crime) सुरू झाले. पायलटने आम्हाला कळवलं की, फ्लाइटला आणखी उशीर होईल.
बेल्स्कियाच्या मते, पायलटवर (Indigo Flight) हल्ला करणं पूर्णपणे चुकीचं आहे. ती कोणत्याही प्रकारे याचं समर्थन करत नाही. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की पायलटने आमच्याशी चांगले वागण्याऐवजी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली, असं ती म्हणाली.
कोण आहे साहील
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या पायलटचं नाव अनूप कुमार आहे. तर पायलटला मारहाण करणाऱ्या प्रवाशाचं नाव साहिल कटारिया आहे. दिल्ली पोलिसांनी कटारियाविरुद्ध मारहाणीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
साहिल कटारिया 35 वर्षांचा आहे. तो पूर्व कैलास, दिल्ली येथे राहतो. अमर कॉलनीत त्यांचे खेळण्यांचे आणि स्टेशनरीचे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साहिल कटारियाचे नुकतेच लग्न झाले आहे. तो पत्नीसह हनिमूनला गोव्याला जात होता मात्र, विमानाला सुमारे १३ तास उशीर झाला. त्यामुळे त्याचा राग शिगेला पोहोचला आणि त्यानी रागाच्या भरात पायलटला (Indigo Flight) मारहाण केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.