IndiGo Cabin Crew Saam Tv
देश विदेश

इंडिगोचे काही कर्मचारी रजेवर गेल्यानं ५५ टक्के उड्डाणांना फटका, 'हे' कारण आलं समोर

इंडिगोचे कर्मचारी अचानक आजारी पडल्याचे कारण देऊन रजेवर गेले. त्यामुळे जवळपास ५५ टक्के विमानांना उशीर झाला.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: सुट्टी प्रत्येकाला हवी असते. सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असतात, पण खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जास्त सुट्ट्या नसतात. शनिवारी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असणाऱ्या इंडिगो (IndiGo) कंपनीत कर्मचारी सुट्टीवर गेल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. शनिवारी एकाच दिवशी इंडिगो कंपनीतील अनेक आजारी असल्याचे कारण सांगून कर्मचारी रजेवर गेले. अचानक सर्वच कर्मचारी रजेवर गेल्यामुळे इंडिगोच्या ५५ टक्के फ्लाइट्सवर त्याचा परिणाम झाला. काही फ्लाईट रद्द कराव्या लागल्या, तर काही फ्लाईट उशीरा निघाल्या. त्यामुळे प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली. हे सर्व कर्मचारी अचानक रजेवर जाण्याचे कारणही तसेच होते. त्यामुळे हे कर्मचारी अचानक एकदम रजेवर गेले होते. (IndiGo Cabin Crew)

टाटा समूहाच्या मालकीची असणारी टाटा (Tata) एअर लाईन्स या कंपनीने देशभरातील अनेक शहरांमध्ये वॉक-इन मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. यातच इंडिगो कंपनीतील अनेक कर्मचारी या मुलाखतीमध्ये सामील झाले. त्यामुळे इंडिगोचो अनेक कर्मचारी अचानक आजारी पडले. आजाराचे कारण सांगून अनेक क्रू मेंबर्स टाटामध्ये (Tata) कंपनीत मुलाखत देण्यासाठी गेले होते.

कर्मचारी अचानक गायब झाल्याने इंडिगोमध्ये गोंधळ निर्माण झाला. इंडिगोसह काही विमान कंपन्यांनी एअर इंडियाला एनओसीशिवाय त्यांच्या क्रूची भरती करू नये अशी विनंती केली आहे. या मुलाखतीमुळे इंडिगोचे अनेक विमाने विमानतळावर अडकली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. काही उड्डाणे रद्द करावी लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता इंडिगोने एअर इंडियाला एनओसीशिवाय भरती न करण्याची विनंती केली आहे.

या प्रकरणाची दखल विमान वाहतूक नियामक ( DGCA) ने घेतली. डीजीसीएने या प्रकरणी अहवाल मागवला आहे. इंडिगोला या संबंधी अहवाल मागितला आहे. याची कारणे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. (IndiGo Cabin Crew Latest News)

गेल्या काही महिन्यांपासून इंडिगो कंपनी नुकसानीत आहे. कोरोना (Corona) महामारीच्या काळात विमान कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली होती. कोरोना संकट येण्यापूर्वी इंडिगो ही एकमेव विमान कंपनी नफ्यात चालत होती. या पगार कपातीमुळे अनेक कर्मचारी नाराज होते. काही कर्मचाऱ्यांना कंपनीने निलंबित केले होते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती होती. (IndiGo Cabin Crew Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP : भाजपच्या निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये राडा, नाराजांना हटवण्यासाठी पोलीस दाखल, पाहा व्हिडिओ

Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...

China Video: चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा न करता तरुणाने वाचवलं| VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स, ट्रेडिशनल टू वेस्टर्न लूकवर उठून दिसतील

SCROLL FOR NEXT