मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ठरावाच्या विरोधात ९९ मते पडली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार फटकेबाजी केली. 'ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, त्यांचे आभार तर मानतोच. तर अप्रत्यक्षपणे ज्या सदस्यांनी हा प्रस्ताव प्रचंड मताने पारीत व्हावा याकरिता बाहेर राहून मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
काँग्रेसचे (Congress) नेते अशोक चव्हाण आणि विजय वड्डेटीवार उशीरा आल्याने त्यांना विधान भवनाच्या बाहेर थांबावे लागले. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. हाच मुद्दा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला. विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे अनेक आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीला सभागृहात ९९ मते मिळाली. तर शिंदे-फडणवीस सरकारला १६४ मते मिळाली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, १९८० मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून काम सुरू केले. त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पाडत आता मुख्यमंत्री पदावर आहेत. शिंदे यांनी आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनात सहभाग घेतला. शिंदे यांनी अनेक सामान्य लोकांना मदत केली आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम केले. २००४ पासून सलग चारवेळा ते विधानसभेत आले आहेत. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. शिंदे यांनी बेळगाव सीमावादात काम केले आहे. त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. सीमाप्रश्नात त्यांना ४० दिवस बेल्लारी झेलमध्ये राहावे लागले, असंही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
समृध्दी महामार्गासाठी ग्राउंडवर जाऊन काम करणारे एकनाथ शिंदे आहेत. यातून त्यांनी आपल्या कामाची झलक दाखवली आहे. आता अनेक प्रोजेक्टवर काम करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी आरोग्य खात्यावरही काम केले आहे. आरोग्य खाते त्यांचे आवडते खाते आहे, असंही फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.