IndiGo pilot shortage due to new duty time rules Saam Tv
देश विदेश

Indigo Airlines: २४ तासांत ५५० हून अधिक उड्डाणे रद्द, इंडिगोच्या प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

IndiGo pilot shortage due to new duty time rules: इंडिगो एअरलाइन्सची ५५० हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद एअरपोर्टवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

Priya More

Summary -

  • २४ तासांत इंडिगोची ५५० हून अधिक उड्डाणे रद्द

  • पायलट ड्युटी टाईम नियमांमुळे पायलटची मोठी कमतरता निर्माण

  • देशातील मोठ्या विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

  • सरकारकडून इंडिगोला तातडीने समस्या सोडवण्याचे निर्देश

इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नवीन 'पायलट ड्युटी टाईम लिमिटेशन्स' नियमांमुळे इंडिगोला पायलटच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथून ५५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. कंपनीने १० फेब्रुवारीपर्यंत या नियमात सवलत मिळावी, अशी मागणी डीजीसीआयकडे केली आहे.

इंडिगोच्या फ्लाइटचे उड्डाण रद्द झाल्यामुळे तिकीट दरात मोठी वाढ झाली असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. सलग तिसऱ्या दिवशी एअरलाइनने असंख्य उड्डाणे रद्द केली आहेत. ज्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. विलंब आणि उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचता आले नाही आणि त्यांना तासंतास विमानतळावर वाट पाहावी लागली त्यामुळे प्रवासी आक्रमक झाले होते. विमानतळ टर्मिनलच्या आत आणि बाहेर लांब रांगा लागल्या.

संतप्त प्रवाशांनी एअरलाइन कर्मचाऱ्यांशी वाद घातला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने वारंवार इंडिगो उड्डाणे रद्द होण्याच्या समस्येला गांभीर्याने घेतले आहे. मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक घेतली. त्यांनी इंडिगोच्या व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सूचना दिल्या.

इंडिगो कंपीने एक अधिकृत निवदेन जरी केले आणि त्यांनी माफी मागितली आणि सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. एअरलाइनने म्हटले की, 'गेल्या दोन दिवसांपासून इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. आम्ही सर्व प्रवाशांची माफी मागतो. आमच्या टीमकडून सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांना नियमित अपडेट्स दिले जात आहेत आणि त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती तपासण्याचे आवाहन केले जात आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'च्या विजेत्याला ट्रॉफीसह किती रक्कम मिळणार? टॉप ३ मध्ये 'या' नावांची चर्चा

IND vs SA: तिसऱ्या वनडेसाठी भारताच्या प्लेईंग ११ मध्ये होणार मोठा बदल, 'या' खेळाडूला दाखवणार बाहेरचा रस्ता

Pune : पुणे-नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत, रस्ता अडवून एसटी चालकाला मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

Turichya Shenga Benefits: हिवाळ्यात उकडलेल्या तुरीच्या शेंगा खाण्याचे काय?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा

SCROLL FOR NEXT