Operation Sindoor Saam Tv
देश विदेश

Operation Sindoor: पाकिस्तानात घुसून मारले, भारताचा मध्यरात्री एअर Strike, 9 दहशतवादी तळ उडवले

Operation Sindoor Against Pakistan: भारताने पाकिस्तानवर कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले आहे.

Siddhi Hande

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ निष्पाप पर्यटकांना जीव गेला. यानंतर आता भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली आहे. भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केले आहे. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशवादी तळांवर कारवाई केली आहे.

ऑपरेशन सिंदूर नक्की आहे तरी काय?

भारताने ७ मेच्या मध्यरात्री काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर स्ट्राइक केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्यापत काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे.

पहलगाममधील हल्ल्यानंतर १५ दिवसांतच बदला

दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांतच भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानवर मध्यरात्री एअर स्ट्राईक केले. यात ९ दहशतवादी हल्ले उडवून दिले. यात पाकव्यापत काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये हल्ला करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यातील निष्पाण मृत व्यक्तींना आता न्याय मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील कार्यालयावरील बॅनर हटवले

Crime: नवऱ्यासमोर बायकोवर सामूहिक बलात्कार, आरोपींकडून पीडितेच्या गुप्तांगावर अनेक वार

कोचिंग सेंटरला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडकीतून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर! आता कुठल्याही रेशन दुकानातून मिळणार धान्य

वयाच्या 40 व्या वर्षी रक्तातील साखर किती असावी?

SCROLL FOR NEXT