Vande Bharat Metro Train Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Metro Train : वंदे भारत मेट्रोचं तिकीट फक्त ३० रुपये! कुठे थांबणार, प्रवासाला किती वेळ लागणार? वाचा सविस्तर

What Is Vande Bharat Metro Train Ticket : देशात वंदे भारत मेट्रो ट्रेन आता सुरू होणार आहे. फक्त ३० रूपयांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : वंदे भारतनंतर आता वंदे भारत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत येत आहे . गुजरातमधील भुज ते अहमदाबाद दरम्यान पहिली वंदे भारत मेट्रो सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ सप्टेंबर २०२४ रोजी या वंदे भारत मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालणार असल्याची माहिती मिळतेय.

वंदे भारत मेट्रो ट्रेन

ही गाडी नऊ स्थानकांवर थांबणार आहे. अंजार, गांधीराम, भचाऊ, समखियाली, हलवड, ध्रंगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमती, असे भुज ते अहमदाबाद वंदे भारत मेट्रो ट्रेनचे थांबे (Vande Bharat Metro Train) आहेत. प्रत्येक ठिकाणी सरासरी दोन मिनिटे थांबणार असल्याची माहिती मिळतेय. प्रवाशांसाठी किमान भाडे ३० रुपये आहे. एकेरी प्रवासाच्या तिकिटांसाठी अनुक्रमे ७ रुपये, १५ रुपये आणि २० रुपये आकारले जाणार आहेत.

कुठे थांबणार, कधी निघणार?

ही ट्रेन अहमदाबाद ते भुज अंतर ५ तास ४५ मिनिटांत पूर्ण करणार असल्याची माहिती मिळतेय. भुज आणि अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना लाभ देण्यासाठी नवीन मेट्रो सेवा तयार करण्यात (Vande Bharat Metro Ticket) आलीय. वंदे भारत मेट्रो सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ती प्रतितास १०० ते २५० किमी अशा वेगात धावते. सध्या वंदे भारत मेट्रो ट्रेनमध्ये १२ कोच आहेत. नंतर या कोचची संख्या वाढवून १६ करण्यात येणार असल्याचं समोर आलंय. वंदे भारत मेट्रो भुज स्टेशनवरून पहाटे ५ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल आणि सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ते अहमदाबादहून संध्याकाळी साडेपाच वाजता निघेल आणि रात्री ११ वाजून १० मिनिटांनी भुजला पोहोचेल.

वंदे भारत मेट्रो ट्रेनचं तिकीट काय?

पहिल्या वंदे भारत मेट्रोचे तिकिट कमीत कमी ३० रुपये असणार (Vande Bharat Metro Time) आहे. तर ५० किमीच्या प्रवासासाठी ६० रुपये असेल. वंदे भारत मेट्रो ट्रेनचा मासिक पास देखील वैध आहे. साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनचं तिकिट मेट्रो ट्रेनला चालणार नाही. वंदे भारत मेट्रोसाठी एसएसटी तिकिट जारी केलं ((Vande Bharat Metro) जातं. ट्रेन सुटण्याच्या आधी प्रवाश्यांना काउंटरवर तिकिट खरेदी करता येणार आहे. ही ट्रेन केवळ ५ तास ४५ मिनिटांमध्ये मेट्रो ३३४ किमीचं अंतर पार करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT